Headlines

लग्न होऊन फक्त दोनच महिने झाले कि आलियाने दिली गुडन्युज, आलिया होनार आई !

रणबीर आणि आलियाने दोन महिन्यांपूर्वी लग्न करुन त्यांच्या चाहत्यांना खूश केले होते. त्यांच्या लग्नामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. पण आता या दोघांनी पुन्हा एकदा चाहत्यांना गोड बातमी देऊन खूश केले आहे.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन ती लवकरच आई बनणार असल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली. तिची ती पोस्ट खूप व्हायरल होत आहे.

आलियाने एक फोटो शेअर करत त्यांचे बाळ लवकरच येणार असल्याची बातमी दिली. या फोटोत आलिया आणि रणबीर हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसते. हे दोघे मॉनिटरवर त्यांच्या होणाऱ्या बाळाला बघत आहेत. या फोटोत आलिया गोड हसत असल्याचे पहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

“>
आलियाने दुसऱ्या फोटोत सिंह सिंहीण आणि त्यांच्या बाळाचा फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये आलियाने , आमचे बाळ लवकरच येत असल्याचे म्हटले आहे. आलियाच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रेटींनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.

रणबीर आणि आलियाने 2 महिन्यांपूर्वी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत होते. अशातच लग्नाच्या दोन महिन्यातच त्यांनी गरोदरपणाची बातमी दिल्याने चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !