Headlines

हातात छत्री, तोंड काळ्या हेल्मेटमध्ये लपलेले… कोण आहेत हे जगप्रसिद्ध लव्ह बर्ड्स? समजल्यावर तुम्हालाही धक्का बसेल !

भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडू सर्व क्रिकेट प्रेमीचा लाडका असतो. या प्रत्येक खेळाडूला प्रत्यक्षात पाहण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सगळेच चाहते फार उत्सुक असतात. त्यांची एक झलक दिसताच क्षणी त्या खेळाडूंपुढे गर्दीचे लोट तयार होतात. त्यामुळे सामान्य लोकांप्रमाणे हे खेळाडू बाहेर बिनधास्त फिरताना आपल्याला क्वचितचं दिसतात आणि जरी फिरत असतील तरी कोणी आपल्याला ओळखू नये आणि गर्दी होऊ नये याचा ते नक्कीच प्रयत्न करतात.

अशाच एका क्रिकेटपटूचा आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे स्कुटीवरून फेरफटका मारताना दिसत आहेत. काळ्या रंगाचा हेल्मेटने दोघांनी ही आपले चेहरे झाकले होते पण हा खेळाडू आणि त्याची पत्नी इतके प्रसिद्ध आहेत की चाहत्यांनी त्यांना लगेच ओळखले.

हेल्मेटमध्ये ही लोकांनी ओळखले – स्कुटीवर बिनधास्त फिरणार जोडपं इतर कोणी नसून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा होते. या दोघांचा फेरफटका मारणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलिशान गाड्यांचा शौकीन असलेला विराट कोहली एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आपल्या पत्नीसोबत स्कूटीवर इतक्या सहजपणे फिरतो हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. हेल्मेटमुळे त्याला काही जण ओळखू शकले नसतील पण जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची ओळख झाल्यावर आश्चर्याचा धक्का बसला असेल.

विराट झिम्बाब्वे दौऱ्यावर नाही – विराट कोहली टीम इंडियाच्या सध्या सुरू असलेल्या झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेला नाही. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरही तो संघाचा भाग नव्हता. तथापि, तो २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरू होणार्‍या मिनी वर्ल्ड कप म्हणजेच आशिया कप २०२२ साठी संघात परतणार आहे. तो दौऱ्यावर गेला नसला तरीही त्याने मुंबईत सराव सुरू ठेवला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


चाहत्यांना विराटच्या शतकाची प्रतिक्षा – भारतीय संघाचे चाहते विराट कोहलीच्या शतकाची वाट पाहत आहेत. कोहलीने २०१9 मध्ये शेवटचे शतक झळकावले. तेव्हापासून त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. त्याच्या फॉर्मबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, परंतु संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली त्याच्या फॉर्ममध्ये परत येण्याची पूर्ण आशा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !