दिग्दर्शिका फराह खान सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिच्या मजेशीर अंदाजात ती नेहमीच तिच्या मित्र मैत्रीणींसोबत मस्ती करत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर जे फोटो पोस्ट करते ते खूप व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा तिचा एक फोटो व्हायरल होत आहे.
त्या फोटोत फराह खान सोफ्यावर बसली आहे तर अभिषेक बच्चन तिच्या मांडीवर बसला आहे. या फोटोत दोघांचे एक्सप्रेशन अगदीच पाहण्यासारखे आहे. या फोटोवर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
हा फोटो विरल भयानीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या फोटोत दोघेही खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. हा फोटो करण जोहरच्या बर्थडे पार्टीमधला असल्याचे म्हटले जाते. फराह खानने संपूर्ण फोटो शेअर केला आहे.
या फोटोत करण जोहरसुद्धा दिसत आहे. फराहने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत ती तिचे सुजलेले पाय दाखवत आहे. यावरुन असे लक्षात येते की अभिषेकला मांडीवर बसवणे तिला किती भारी पडले.
त्या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, प्रेमाचे अनोखे प्रदर्शन अभिषेकने केले पण त्याचे काही दुष्परिणामसुद्धा आहेत. ज्यूनियर वाट बघ जो पर्यंत मी तुझ्या मांडीवर बसत नाही. तिच्या या पोस्टवर हजारो लाइक्स आले आहेत. तर अभिषेकने कमेंट करत म्हटले की, तुझ्या वयाचा दोष मला देऊ नको. त्याचा हा रिप्लायसुद्धा लोकांना खूप आवडला.
त्यांच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास फराह राजेश खन्नाच्या जीवनावर आधारित चित्रपटावर काम करत आहे. ती तो चित्रपट दिग्दर्शित करत असल्याचे म्हटले जाते. तर अभिषेक बच्चन लवकरच गुलाब जामून या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक पत्नी ऐश्वर्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !