अक्षय कुमार अशा लोकांना पैकी एक आहे ज्यांनी स्वतः सर्वप्रथम पुढे येऊन कोरोना मदत निधी मध्ये काही रक्कम दान केली. अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअरफंड मध्ये २५ करोड रुपये दान करत असल्याची घोषणा केली होती.
मात्र त्यानंतर सगळीकडून अक्षयकुमारला केवळ टोमणे ऐकावे लागले. काहींचे म्हणणे होते की अक्षय कुमारचे हे पाऊल एक राजकारण होते तर काहींनी सांगितले की त्याचा हा पीआर चांगला करण्याचा प्रयत्न आहे. वरुण धवन सारख्या काही कलाकारांनी मदत करताना पीएम केअर फंड व्यतिरिक्त सीएम केअर फंड मध्ये सुद्धा दान केले आहे.
पण अक्षय कुमार ने संपूर्ण पैसे फक्त पी एम केअर फंड मध्येच दिले. अक्षय कुमारच्या एका चुकीमुळे त्याला बॉलिवुडच्या कानाकोपर्यातून बोलणी ऐकावी लागत आहेत. जसे अक्षय कुमार ने घोषित केले की तो पधानमंत्री केअर फंडमध्ये २५ करोड रुपये दान केले आहेत तसे त्याला सगळीकडून टोमणे येऊ लागले काही लोकांचे असे म्हणणे आहे की अक्षय कुमार ने जाणून बुजून स्वतःला मोठा दाखवण्यासाठी ही घोषणा केली असावी.
बॉलीवुडच्या महानायक आणि मंदिर अमिताभ बच्चन ने तर सरळ सरळ टोमणा मारला की काही लोक असे असतात जे दिल्यावर सगळीकडे सांगत फिरतात आणि काही लोक असेही असतात जे खूप देऊन सुद्धा त्याबद्दल कुठेही वाच्यता करत नाहीत. मला नेहमी यातील दुसऱ्या श्रेणीत राहणे पसंत आहे.
अमिताभ बच्चन यांनी एकाच वेळी नव्हे तर अनेक वेळा ट्विटरवरून ही गोष्ट बोलून दाखवली आहे तर गायक सोना मोहापात्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर लिहिले आहे की एखादी गोष्ट दान केल्यावर त्या गोष्टीचा वापर स्वतःच्या पीआर साठी करणे चांगले नाही आणि पीआर चा उपयोग करून आपण किती चांगले आहोत हे दाखवणे जरुरी नसते. टीकाकारांच्या यादीत शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव सुद्धा सहभागी आहे त्यांनी हल्लीच असे म्हटले की दान केल्यावर आपण किती दान केले ही गोष्ट सतत सर्वत्र सांगू नये. त्यामुळे इतर लोक प्रेशर मध्ये येऊ शकतात.
तर काही लोकांनी अक्षय कुमारच्या बाजूने साथ दिली आहे त्यांनी अक्षय कुमार चे कौतुक करत म्हटले आहे की अक्षय कुमारच्या या घोषणेमुळे इतर लोकांना सुद्धा दान करण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल ट्विटरवरून अक्षयकुमारला लाखो लोकांच्या शाबासकी मिळाल्या आहेत. त्यामुळे लोकांनी अक्षय कुमार ला त्यांचा हिरो मानला आहे. तर काही लोकांनी या गोष्टीत विरोध दर्शवला आहे त्यांचे असे म्हणणे आहे ही प्रेरणा द्यायची असेल तर ती मी दान केले एवढे म्हणून पण दिली जाऊ शकते. मी इतकी रक्कम दान केली हे सांगण्याची आवश्यकता नाही असे सांगितल्यावर आपण स्वतःला महत्त्व प्राप्त करून देतो.
हे वाचा – बॉलीवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’ वापरतो या ब्रँडचे शूज, किंमत पाहून विश्वास नाही बसणार !आता दान केल्यावर ते सांगावे कि नाही तसेच दान देताना ते किती केले हे सांगावे की नाही अशा प्रकारचे दोन गट सोशल मीडिया आणि ट्विटरवर पडले आहेत. पण अधिकतर लोकांचे म्हणणे आहे की दिल्यावर ती रक्कम घोषित करू नये. यातच शाहरूख खानचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्यामध्ये तो सांगतो की कधीच आपल्या दान पुण्याच्या गोष्टी सगळ्यांसमोर जाहीर करू नयेत कारण कुराणात असे लिहिले आहे की या गोष्टी फक्त स्वतःपुरत्या सीमित ठेवाव्यात.
हे वाचा – दीपिका पादुकोणला का आला राग, म्हणाली सेलिब्रिटीज यांना मूर्ख समजायचे बंद करा !ज्यावेळेस अक्षय कुमार ने घोषित केले की तो २५ करोड रुपये दान करत आहे त्यावेळी त्याची पत्नी ट्विंकल खन्नाने ट्विट केले की, मी माझ्या पतीला विचारले की अशा वेळी आपण एवढी मोठी रक्कम दान करणे जरुरी आहे का पण यावर अक्षयकुमार जरा देखील भितरला नाही उलट त्याला या गोष्टीवर खूप गर्व आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आपापल्यापरीने गरजू लोकांना मदत करीत आहेत पण त्यांनी याबाबतीत कोणतीच घोषणा केली नाही किंवा दान केलेल्या रकमेची कोठेच वाच्यता केली नाही.
अजून पण सोशल मीडियावर हा वाद होतच आहे की दान केलेल्या रकमेची घोषणा व्हावी की होऊ नये. काहीवेळेस हि घोषणा इतर लोकांमध्ये हीन भावना निर्माण करते. पण या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केलेली मदत ही गरजू लोकांपर्यंत पोहोचते आहे की नाही हे तपासणे.
हे वाचा – इंस्टाग्रामवर पोस्ट करून कलाकार मिळवतात तब्बल एवढे पैसे, वाचून अवाक व्हाल !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !