बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे ३० एप्रिलला मुंबईत निधन झाले. ऋषी कपूर यांच्या अंत्ययात्रेत कपूर खानदानातील मुख्य वीस लोकच उपस्थित राहू शकले. सध्या कोरोना मुळे देश लॉक डाऊन असल्याकारणाने पोलिसांनी कपूर खानदानातील केवळ वीस लोकांनाच अंतिम संस्कारा वेळी उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. कोणतीही गोष्ट घडल्यास कपूर खानदानातील सदस्य एकत्र एक साथ आलेले दिसतात.
हिंदी सिनेमातील पहिला परिवार म्हणून देखील कपूर खानदानाची ओळख आहे. सिनेजगतात कपूर खानदानाच्या प्रत्येक पिढीने आपापले योगदान दिले आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशाच काही अजून प्रसिद्ध आणि पावरफुल खानदानांबद्दल माहिती देणार आहोत.
कपूर खानदान –
बॉलीवूडच्या प्रसिद्ध परिवारामध्ये कपूर खानदानाचा चे नाव आठवणीने घेतले जाते. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील हा परिवार खूप जुना परिवार म्हणून ओळखला जातो. सिनेजगतात पृथ्वीराज कपूर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आले होते. त्यानंतर बॉलीवूड वर मोठ्या काळासाठी राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर या त्यांच्या मुलांनी राज्य केले. त्यानंतर चित्रपट सृष्टीत रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर या त्यांच्या तीन मुलांनी पाऊल ठेवले.
राज कपूर यांचा मोठा मुलगा रणधीर कपूर ने प्रसिद्ध अभिनेत्री बबीता सोबत लग्न केले. रणधीर कपूर यांच्या दोन्ही मुली करीना कपूर खान आणि करिष्मा कपूर बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री आहेत. तर ऋषी कपूर यांनी अभिनेत्री नीतू सिंह सोबत लग्न केले त्यांचा मुलगा रणबीर कपूर सुद्धा आता बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो.
अजून एक कपूर परिवार –
बॉलीवूड वर निर्माता सुरिंदर कपूरचे कुटुंब सुद्धा राज्य करीत आहे. बॉलीवूड मध्ये सुरिंदर कपूर यांचे तीनही मुलगे म्हणजेच बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक आहेत. ८०/९० च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी सोबत बोनी कपूर ने लग्न केले.
श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर सध्या बॉलीवूड अभिनेत्री आहे तर बोनी कपूर यांचा पहिल्या बायकोपासूनचा मुलगा म्हणजेच अर्जुन कपूर सुद्धा बॉलीवूड मधील अभिनेता आहे. शिवाय अनिल कपूर यांच्या दोन्ही मुली सोनम कपूर आणि रिया कपूर या सुद्धा बॉलिवूडमध्ये जोडल्या गेल्या आहेत.
अख्तर आजमी खानदान –
बॉलीवूड मध्ये खूप काळापासून काही कुटुंबांची मुळे अगदी खोलवर रुजली आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी हनी इराणी सोबत पहिले लग्न केले. या दोघांची दोन्ही मुले म्हणजेच जोया अख्तर आणि फरहान अख्तर हे बॉलिवूडमधील नामांकित कलाकार आहेत. जावेद अख्तर यांनी दुसरे लग्न शबाना आजमी सोबत केले.
खान परिवार –
बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची पहिली पत्नी म्हणजे सलमा खान. या दोघांना तीन मुलगी आहेत ते म्हणजे सलमान, अरबाज आणि सोहेल. त्यानंतर सलीम खान यांनी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेलन सोबत दुसरे लग्न केले.
अरबाज खानने मलाइका अरोडा सोबत लग्न केले होते पण लग्नानंतर १९ वर्षांनी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
बच्चन परिवार –
बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे लोकप्रिय कवी हरिवंशराय बच्चन यांचे थोरले चिरंजीव आहेत. अभिनेत्री जया भादुरी सोबत अमिताभ बच्चन यांनी लग्न केले. लग्नानंतर अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांना श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन हे दोन मुले झाली. अभिषेक बच्चन ने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि एकेकाळची विश्वसुंदरी ठरलेली ऐश्वर्या राय सोबत लग्न केले.
मुखर्जी परिवार –
हिंदी सिनेसृष्टीतील नामांकित व्यक्ती शोभना समर्थ ही एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री रतनबाई यांची मुलगी होती. नूतन आणि तनुजा या शोभना समर्थ यांच्या मुली आहेत. मोहनिश बहुल हा नूतन यांचा मुलगा. तर काजल आणि तनिषा या दोघी तनुजा यांच्या मुली आहेत. राणी मुखर्जी ही काजोलची चुलत बहीण आहे. राणी मुखर्जीचे वडिल राम मुखर्जी हे सुद्धा एक चित्रपट निर्माता होते.
हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?चोपडा जोहर परिवार –
बी आर फिल्म प्रोडक्शन हाऊस हे बलदेव राज चोपडा यांनी चालू केले. यश चोपडा हे बलदेव राज यांचे लहान भाऊ होते. यश चोपडा यांनी दिग्दर्शकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. यश चोपडा यांचा मुलगा आदित्य चोपडा हा देखील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. यश जोहर ने यश चोपडा यांची बहीण हिरू सोबत लग्न केले. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा हिरू यांचाच मुलगा.
हे वाचा – या ६ अभिनेत्यांनी साकारली प्रभू रामाची भूमिका, पण यांची ठरली सर्वांत प्रसिद्ध !
हे वाचा – भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना या बॉलिवुड अभिनेत्याला डेट करू इच्छिते !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !