Headlines

‘बाहुबली’ फेम ‘राणा दग्गुबाती’ पडला आहे या मुलीच्या प्रेमात, जाणून घ्या कोण आहे ती ?

दक्षिण भारतीय चित्रपटातील उत्कृष्ट अभिनेता राणा दग्गुबाती हा त्याच्या जबरदस्त अभिनय कौशल्यामुळे ओळखला जातो. राणाने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉलिवूड आणि साऊथ कडील चित्रपट अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये छाप पाडली आहे. राणा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. बाहुबली चित्रपटातील भल्लारदेव या भूमिकेमुळे त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता.
सध्या बॉलीवूड असो किंवा टॉलीवूड कलाकारांमधील रिलेशन च्या बातम्या पसरायला वेळ लागत नाही. रिलेशन च्या चर्चांमध्ये तर राणा देखील असतो. आता तर खुद्द राणा ने त्याच्या रिलेशन च्या गोष्टीला दुजोरा दिला आहे. एखाद्या स्टार चे नाव एखाद्या व्यक्तीशी जोडले जाणे ही एक साधी गोष्ट झाली आहे. आपले रिलेशनशिप सर्वांसमोर उघडकीस आणणे ही गोष्ट खूप कमी वेळेस सेलिब्रिटींच्या बाबतीत घडते. पण या गोष्टीस राणा अपवाद ठरला.
त्याने सर्वांसमक्ष त्याच्या प्रेमाला दुजोरा दिला आहे. राणा च्या या पोस्ट मुळे त्याचा मित्र परिवार आणि फॅन्स त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे ते आनंद देखील व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर राणाने एक फोटो शेअर करून कबूल केले आहे की तो एका व्यक्तीस डेट करत आहे.
राणा दग्गुबाती ने सोशल मीडियावर सांगितले की तो कोणालातरी डेट करतो. राणा ज्या मुलीला डेट करत आहे त्या मुलीचे नाव मिहिका असे आहे. नुकतेच राणाने मिहिका सोबतचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करत राहण्याने कॅप्शन लिहिले की तिने हा म्हटले ! राणाच्या प्रेयसीने त्याला होकार दिल्याची आनंदाची बातमी त्याने सोशल मीडिया वरून त्याच्या चाहत्यांना पर्यंत पोहोचवली. या कॅप्शन सोबत राणाने पुढे दिल वाला इमोजी सुद्धा टाकला आहे.
राणाच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांसोबत फिल्म इंडस्ट्री मधील कलाकार सुद्धा त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दक्षिण भारतीय कलाकारांसोबत हिंदी सिनेमातील कलाकारांनी सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. जेव्हापासून राणाने त्याच्या गर्लफ्रेंड सोबत फोटो टाकला आहे तेव्हापासून तो फोटो खूप व्हायरल होत आहे. मिहिका बजाज एक उद्योजक आहे, जो ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट-कम-डेकोर कंपनी चालवते. मिहिकाने मुंबई येथून इंटिरियर डिझाईनमध्ये डिप्लोमा केला आहे.
राणाने दक्षिण भारतीय चित्रपटांत सोबतच बॉलीवूड मध्ये सुद्धा काम केले. राणा २०११ मध्ये बिपाशा बासू सोबत ‘दम मारो दम’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. याव्यतिरिक्त तो हाउसफुल ४, द गाझी अटॅक, बेबी, ये जवानी है दिवानी यांसारख्या सुपर हिट चित्रपटांमध्ये सुद्धा दिसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *