Headlines

अंबानी कुटुंबाच्या सुना देखील कमवतात करोडो रुपये, जाणून घ्या कश्या ते !

देशातील सर्वात श्रीमंत बिझनेस मॅन कोण असे म्हटले तर आपसूकच मुकेश अंबानींचे नाव समोर येते. मुकेश अंबानींच्या बिझनेस जाळे संपूर्ण जगभर पसरले आहे. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य अगदी ईशा अंबानी पासून ते आकाश अंबानी पर्यंत सर्वजण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम प्रकारे काम करत आहे. आता तर बिजनेस च्या बाबतीत बोलायचे झाल्यास अंबानी कुटुंबाच्या सूना देखील मागे नाहीत. चला तर मग सगळ्यात आधी श्लोका मेहता बद्दल जाणून घेऊ.
आकाश अंबानी ची पत्नी श्लोका मेहता ही देशातील सर्वात मोठी हिऱ्यांची कंपनी ब्लू इंडियाचे प्रबंध निदेशक रसेल मेहता यांची मुलगी आहे. सध्या रिलायन्स जिओ चा संपूर्ण कारभार आकाश अंबानी पाहतात. पण त्यांची पत्नी सुद्धा बिजनेस सांभाळण्यात कोणा पेक्षा कमी नाही. श्लोकाने २०१४ मध्ये तिच्या वडिलांच्या ब्लू फाउंडेशन कंपनीमध्ये डायरेक्टर बनली. ब्लू फाउंडेशन सुद्धा तिच्या वडिलांचा कंपनीचा हिस्सा आहे. एवढेच नव्हे तर अंबानी कुटुंबा सारखीच श्लोका सुद्धा सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये नेहमीच पुढे असते. श्लोका बिजनेस सोबतच एक संस्था सुद्धा चालवते. या संस्थेचे नाव कनेक्ट फॉर असे आहे. श्लोका या संस्थेची को- फाउंडर आहे. मीडिया रिपोर्टनुसार श्लोका मेहता चा नेट वर्थ १८० लाख अमेरिकन डॉलर आहे. म्हणजेच ती दर महिना ऐंशी लाख रुपये कमावते.
आता जर अंबानी कुटुंबातील सर्वात लहान असलेल्या अनंत अंबानी बद्दल बोलायचे झाल्यास सध्या तो राधिका मर्चेंट सोबत असलेल्या रिलेशन मुळे खूप चर्चेत आहे. अनेकदा या दोघांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीता अंबानी यांना राधिका खूप आवडते. राधिका च्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाल्यास राधिका चा परिवार अंबानी कुटुंबाला फार आधीपासून ओळखतो. राधिका चे वडील विरेन मर्चेंट यांचा स्वतःचा एक्स्पोर्ट इम्पोर्ट चा बिजनेस आहे. २००२ मध्ये विरेन यांनी एन्कोअर हेल्थ सर्विसेस या कंपनीची स्थापना केली.
सध्या राधिका तिच्या वडिलांच्या या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम पाहते. याशिवाय राधिकाने केडार कन्सल्टंट, देसाई अँड दिवानजी आणि इंडिया फर्स्ट यासारख्या कंपनीमध्ये काम केले आहे. राधिकाने स्वतःची एक फर्म सुद्धा सुरू केली आहे.
सध्या अंबानी परिवाराची सून श्लोका खूप प्रसिद्ध झाली आहे. आणि जेव्हा पासून राधिका चे नाव सुद्धा अंबानी कुटुंबासोबत जोडले गेल्यापासून तिला सुद्धा लोक ओळखू लागले आहेत. मात्र राधिका आणि श्लोका दोघी खूप वेगळ्या आहेत. पण नीता अंबानी त्यांच्या दोन्ही सुनांवर मुलीसारखे प्रेम करतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *