अमीर खानने सांगितला ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातील जुही आणि स्वतःचा किस्सा !

775

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खानचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. यावर्षी अमीर ने ५५ व्या वर्षात पदार्पण केले. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आमीर खान अग्रस्थानी आहे. त्यामुळेच पूर्ण जगभरात आमीर खानचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. अमीर खान चे संपूर्ण नाव मोहम्मद अमीर हुसेन खान असे आहे. आमिर खान एक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि टेलिव्हिजन सूत्रसंचालक आहे.
आमीरने होली या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले परंतु या चित्रपटात त्याची सहाय्यक अभिनेत्याची भूमिका होती. चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून त्याने कयामत से कयामत तक या चित्रपटामधून सुरुवात केली. या चित्रपटाला आता ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आमीर खान आणि जुही चावला रातोरात स्टार बनले होते. या चित्रपटानंतर आमीर खान आणि जुही चावला यांची जोडी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होऊ लागली.
त्यावेळी या चित्रपटाची क्रेझ इतकी होती की चित्रपटांमधील एक एक भाग लोकांच्या मनामध्ये चांगलाच बसला होता. या चित्रपटामध्ये आमीरचा जुही सोबत एक किसींग सीन होता. परंतु तो या दोघांकडून करून घेण्यास चित्रपट निर्मात्याच्या नाकी नऊ आले होते. या चित्रपटाच्या स्क्रिप्ट नुसार त्यामध्ये ‘अकेले है तो क्या गम है’ हे गाणे चित्रित करण्यात येणार होते. त्यावेळी आमीरला जुहीच्या कपाळावर आणि गालावर किस करायची होती. परंतु जुहीने असे करण्यास नकार दिला. चित्रपटातील किस ही इतकी चांगली आणि आपुलकीची असली पाहिजे की ती बघताना कोणताही वलगर पणा वाटला नाही पाहिजे असे चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मत होते. परंतु जुहीने असे करण्यास साफ नकार दिला होता. त्यामुळे त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मंसूर खान यांना शूटिंग दहा मिनिटांसाठी थांबवावे लागले होते. त्यानंतर दिग्दर्शकांनी समजूत काढल्यावर जुही तो सीन करण्यास राजी झाली आणि चित्रपटाचे चित्रीकरण पुढे सुरू करण्यात आले.
त्यानंतर जुही आणि अमीर ने तो सीन इतका उत्कृष्टरित्या केला की आजही लोक त्याची आठवण काढतात. कयामत से कयामत तक या चित्रपटाच्या प्रदर्शना वेळी प्रमोशनसाठी या चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजे आमीर खान आणि जुही चावला यांनी स्वतः या चित्रपटाचे पोस्टर त्यावेळी रिक्षावाले, टॅक्सी ड्रायव्हर यांना वाटले होते. आणि त्यांना ते गाड्यांच्या पाठी लावल्यास आग्रह केला होता. अशा प्रकारच्या प्रमोशनचा त्यावेळी या चित्रपटाला खूप फायदा देखील झाला. त्यामुळेच या चित्रपटाने रेकॉर्ड तोड कमाई सुद्धा केली. या चित्रपटांमधील गाणी सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटासाठी अमीर खानला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.
आमीरच्या सध्याच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल बोलायचे झाल्यास सध्या तो लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये आमीर खान सोबत करिना कपूर-खान लीड रोल मध्ये दिसेल. हा चित्रपट म्हणजे हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. अमीर च्या वाढदिवसा च्या दिवशी बेबोने म्हणजेच करिनाने इंस्टाग्राम वर अमीर सोबतचा एक खास फोटो शेअर केला होता. यामध्ये विमान प्रवासादरम्यान अमीर खान गाढ झोपला होता तर करीनाने त्याच्यासोबत गपचूप सेल्फी काढली होती. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.