Headlines

प्रोटीन शेक मध्ये बायकोच दूध मिक्स करून पिला हा प्रसिद्ध अभिनेता, नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल !

बॉलिवुड इंडस्ट्रीत असे अनेक कपल आहेत ज्यांना पाहून आपण कपलगोल्स असे आपसूकच बोलतो. त्यातीलच एक क्युटकपल म्हणजे अभिनेता आयुष्यमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप. सध्याचे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया.

आयुष्यमान आणि ताहिरा देखील अनेकदा या सोशल मीडिया माध्यमाद्वारे त्यांचे एकमेकांवरील प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. पण आयुष्यमानला मात्र ताहिराची एक गोष्ट आवडत नाही, त्याबाबत त्याने नुकताच खुलासा केला.

काही दिवसांपूर्वीच ताहिराने लिहिलेले ‘द 7 सिंस ऑफ बीइंग अ मदर’ हे पुस्तक लॉन्च झाले. वाचकांनी या पुस्तकाची फार प्रशंसा केली. ताहिराने तिच्या पुस्तकात से’क्स लाईफपासून ते प्रेग्नंसीच्या प्रवासाबद्दल सर्व लिहिले आहे.

या पुस्तकात ताहिराने लिहिले की, एकदा तिच्या मुलासाठी पंप केलेले ब्रे’स्ट मिल्क तिचा नवरा प्यायला होता. तसेच मुलं झाल्यावर पुन्हा ते दोघे हनिमूनसाठी गेले होते पण त्यांचा तो हनिमून सक्सेसफूल झाला नाही.

आयुष्यमान आणि ताहिराचा मुलगा विराजवीर ७ महिन्यांचा असताना ते त्याला आईवडीलांकडे ठेवून बॅकॉंकला हनिमूनला गेले होते. ताहिरा तेव्हा ब्रे’स्ट फिडिंग मदर असल्यामुळे तिला ब्रे’स्ट मिल्क काढावे लागायचे. तिथे हॉटेलमध्ये गेल्यावर तिने तेच केले व आपल्या बाळाचे हालहवाल विचारण्यासाठी ती तिच्या आईसोबत बोलत होती.

परत येईन पाहते तर पंप केलेल्या दुधाची बॉटल रिकामी होती. तर आयुष्यमान बेडवर आरामात झोपला होता. जेव्हा तिने त्या रिकामी बॉटलबद्दल प्रश्न केला तेव्हा त्याने मिशीला लागलेले दूध पुसत म्हणाला की ते दुध खूप पौष्टिक असल्यामुळे प्रोटीन शेकसोबत चांगले मिक्स झाले.

सोबतच ताहिराने सांगितले की ती एकदा रेस्टॉरंण्ट मध्ये तिच्या लहान मुलाला विसरुन गेलेली. जेव्हा ती तिच्या मित्र मैत्रीणींसोबत लंचसाठी गेली होती. तेव्हा निघायच्या वेळेस तिच्या बॅग घेण्याचे लक्षात राहिले, पुढे जाऊन तिने बिल भरले, पण मुलाला न घेताच ती रेस्टॉरण्टच्या बाहेर गेली. तेव्हा तिथल्या वेटरने मी माझ्या मुलाला विसरुन जात असल्याची आठवण केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap)


आयुष्यमान 12 वी ला फिजिक्स शिकण्यासाठी क्लासला जायचा तिथेच त्याची आणि ताहिराची ओळख झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कॉलेज संपल्यावर एम टीव्हीवरील रोडीज 2 या शो मधून आयुष्यमानने त्याच्या करियरला सुरुवात केली.

तो त्या शोचा विजेता ठरलेला. त्याच दरम्यान आयुष्यमानने ताहिराला लग्नासाठी मागणी घातली आणि मग दोघांनी लग्न केले. या जो़डप्याला आता विराजवीर आणि वरुष्का ही दोन मुले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !