Headlines

बाहुबली चित्रपटातील बिज्जलदेव या पत्राबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील !

बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच इतिहास रचला आहे. या चित्रपटाचा वेगळाच चाहतावर्ग आपल्याकडे पाहायला मिळतो. या चित्रपटातील प्रत्येक पात्राची एक वेगळी अशी ओळख आहे. त्यामुळे हे पात्र निभावणाऱ्या प्रत्येक कलाकाराने चित्रपटांमध्ये समरसून काम केले आहे आणि कौतुकाचे मानकरी ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या चित्रपटातील अशा पात्राबद्दल सांगणार आहोत ज्याने विकलांगा ची भूमिका निभावून सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे पात्र म्हणजे भल्लालदेव चे वडील बिज्जल देव. बिज्जल देव असे पात्र नास्सर यावी अभिनेत्याने साकारले होते.
बाहुबली चित्रपटांमधील बिज्जल देव हे पात्र सुद्धा लोकांना फार पसंतीस पडले होते. कारण बिज्जल देव या पत्राने चित्रपटांमध्ये एक वेगळेच वळण आणले होते. आज आम्ही तुम्हाला नास्सर यांच्या जीवनासंबंधी काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्ही आधी कधी ऐकल्या नसतील.
बिज्जल देव यांची भूमिका साकारणाऱ्या नास्सर यांचे पूर्ण नाव एम नास्सर असे आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु नास्सर यांना अधिक प्रसिद्धी ही बाहुबली मधील बिज्जल देव या भूमिकेमुळेच मिळाली. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांना सारा देश ओळखू लागला.
नास्सर यांचा जन्म ५ मार्च १९५८ मध्ये मद्रास राज्यातील चेंगलपट्टू मध्ये झाला. आज-काल नास्सर यांच्या अभिनयाचे कौतुक जो-तो करत असतो. काही लोकांचे तर नास्सर हे एक आयडल बनले आहेत ते त्यांच्या सारखे बनू इच्छितात. परंतु हे सारे यश नास्सर यांना अगदी सहज मिळाले नाही. त्यासाठी त्यांना जीवनात मोठा संघर्ष करावा लागला आहे.
करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांना खूप सार्‍या अडचणींना सामोरे जावे लागले होते. एक काळ तर असा होता की ज्यावेळी जीवनातील छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये वेटरचे काम करावे लागले होते. एवढेच नव्हे तर सुरुवातीला त्यांनी सिक्युरिटी गार्डची नोकरी सुद्धा केली होती.
त्यावेळी नास्सर फिल्म इंडस्ट्री मध्ये सुद्धा आले नव्हते. ते त्यांच्या मेहनतीने स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करत होते. १९८५ मध्ये पहिल्यांदा नास्सर यांना बालाचंदर यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी जरी ती भूमिका ही सहाय्यक भूमिका असली तरी आता मात्र स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये एक जागा निर्माण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *