बॉलिवूडमधील अभिनेत्री या नेहमीच त्यांच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असतात. त्यांचं मोहवून टाकणार सौंदर्य त्यांच्या या विविध फॅशनेबल कपड्यांमुळे अधिक खुलून दिसतं. अनेक विविध कार्यक्रमांना त्यांची ड्रेसिंग स्टाईल चार चांद लावत असतात. काही वेळेस त्यांचे ड्रेस फारच बोल्ड असतात.
सध्या अशाच बोल्ड ड्रेसवरून एक ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पटनी चर्चेत आहे. तिच्या या बोल्ड अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या इंस्टाग्रामवरील अनेक फोटोज वेगवेगळ्या फॅशन स्टाईलने परिपूर्ण असून ते फोटो चाहत्यांना भुरळ पाडतात. असाच एक मरून कलरच्या गाऊन वरचा डीप नेक फोटो पोस्ट करताच काही मिनटात व्हायरल झाला. तिच्या या फोटोमधील बोल्ड अंदाजाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह या फोटोज मध्ये अभिनेत्री मरून कलरच्या ऑफ शोल्डर फिटेड गाऊनमध्ये ब्रालेस स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने हा लूक अतिशय सिझलिंग स्टाईलमध्ये कॅरी केला आहे. तिचा लुक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने चमकदार हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत.
यासोबत तिने कानात छोटे झुमके घातले आहेत. या ड्रेसमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे खूपच हॉट दिसत आहे. दिशा पटनीचा सुंदर, सोज्वळ लूक, फिट फिगर यामुळे ती अधिक मोहक दिसते. तिच्या अदा देखील प्रत्येकाला घायाळ करणाऱ्या असतात. दिशा पटनी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा चाहते तिला पाहतच राहतात.
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या लुक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते. दिशा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. अशा परिस्थितीत, नेटकरी, चाहते नेहमीच तिच्या या नवीन लूकची आतुरतेने वाट पाहत असतात.
View this post on Instagram
दिशाबद्दल सांगायचे झाले तर तिने तेलगू चित्रपट लोफर मधून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि त्यानंतर एम एस धोनी या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली आणि तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चायनीज ऍक्शन चित्रपट ‘कुंग फु योगा’ या चित्रपटामध्ये देखील तिने काम केले आहे.
त्यानंतर ‘बाघी’ चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आणि ती प्रसिद्धीच्या झोतात देखील आली. सध्या दिशाला अनेक विविध चित्रपटांसाठी संधी मिळत आहेत. लवकरच ती ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे.
अभिनेत्रीचा तोच लूक आणि स्टाइल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याशिवाय दिशा दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनच्या ‘प्रोजेक्ट के’मध्येही दिसणार आहे. तर सोबतच ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ‘योद्धा’ चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !