Headlines

बॉलीवूडच्या या लाडक्या सूनांनी सासऱ्यांसोबत फक्त चित्रपटात काम नाही तर रोमान्स पण करायला मागे पुढे पाहिले नाही !

बॉलिवूडमध्ये पूर्वीपासून अभिनय क्षेत्रात असणारी मोठी घराणी आहेत. कपूर, बच्चन, खान अशी विविध घराणी आहेत ज्यांच्या पिढ्यानंपिढ्या बॉलिवूडमध्ये अभिनय करत आहेत. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या बॉलीवुड घराण्यांमध्ये लग्न केले आहे. पण तत्पूर्वी असे काही अभिनेते अभिनेत्री आहेत ज्यांनी एकमेकांसोबत पडद्यावर काम केले आहे आणि नंतर त्या अभिनेत्यांच्या ती अभिनेत्री सून देखील झाली आहे.

एखाद्या चित्रपटाच्या कथेच्या गरजेनुसार त्या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी कलाकारांना कास्ट केले जाते. त्यामुळे आपल्यासमोर वय वर्ष यापेक्षा त्या कथेला साजेसा अभिनेता किंवा अभिनेत्री यांच्यासोबत कलाकारांना काम करायचे असते आणि मग त्या कलाकारासोबत रोमान्स देखील करावा लागतो.

काही वेळेस त्याच कुटुंबातील कलाकारांच्या घरी अभिनेत्री सून म्हणून जातात. तर आज आपण अशाच काही अभिनेत्री बघणार आहोत ज्यांनी पडद्यावर त्यांच्या सासऱ्या सोबत काम देखील केले आहे आणि रोमान्स देखील केला आहे.

समंथा रुथ प्रभु-नागार्जुन – सासरे आणि सुनेच्या जोडीतील पहिलं नावं आहे प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि नागार्जुन यांची आहे. समंथा ही सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. २०१७ मध्ये तिने नागा चैतन्यसोबत लग्न केले. मात्र, काही वेळापूर्वीच समंथा आणि नागा चैतन्य यांचा घ’ट’स्फो’ट झाला. समंथाने नागार्जुनसोबत हॉरर कॉमेडी चित्रपट ‘राजू गरी गधी 2’ मध्ये काम केले आहे.

आलिया-ऋषि कपूर – सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त अभिनयाने परिपूर्ण असे बॉक्स ऑफिसवर गाजणारे चित्रपट देणारी अभिनेत्री आलिया भट. आलिया भटने बॉलीवूड मधील सर्वात जुने घराणे असलेल्या कपूर घराण्यामधील रणबीर कपूर यांच्याशी हल्लीच विवाह केला.

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत तिने दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. आलियाने ऋषी कपूरसोबत काम केले तेव्हा ती त्यांची सून नव्हती. ऋषी यांच्या निधनानंतर आलिया कपूर कुटुंबाची सून बनली आहे. आलियाने ऋषी कपूरसोबत ‘स्टुडंट ऑफ द इयर’ आणि ‘कपूर अँड सन्स’मध्ये काम केले आहे.

नीतू कपूर-शशि कपूर – आलिया भटच्या सासूने देखील तिच्या सासऱ्यांसोबत म्हणजेच ग्रेट ऍक्टर शशी कपूरसोबत काम केले आहे. नीतू कपूरने तिचे सासरे शशी कपूर यांच्यासोबत अनेक रोमँटिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वास्तविक, शशी कपूर हे नात्यातील नीतू कपूरचे काका सासरे लागतात.

त्याच बरोबर या दोघांचे एक रोमँटिक गाणे ‘कह दूँ तुम्हे’ खूप लोकप्रिय झाले आहे. दोघांनी ‘एक और एक ग्यारह’, ‘काला पानी’ आणि ‘दीवारी’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ऐश्वर्या राय बच्चन- अमिताभ बच्चन – आता आपण बोलणार आहोत बॉलिवूडमधील बिग बी असलेल्या बच्चन घराण्याबद्दल. ऐश्वर्या राय बच्चननेही सासऱ्यांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. दोघांनी ‘बंटी और बबली’, ‘क्यों हो गया ना’, ‘मोहब्बतें’मध्ये एकत्र काम केले आहे.

‘बंटी और बबली’मधील ‘कजरा रे’ याच गाण्यात बिग बी आणि अभिषेक बच्चन यांनीही ऐश्वर्यासोबत जबरदस्त डान्स केला आहे. हे गाणे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नापूर्वीचे होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !