बॉलीवूड चित्रपटांचे चाहाते जगभर पसरले आहेत. या चित्रपटां सोबतच त्यात काम करणारे कलाकार सुद्धा खूप प्रसिद्ध होतात. आपल्या आवडीचे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा असते. काही वर्षांपूर्वी ‘तुम बिन’ हा चित्रपट आला होता जो त्याकाळी हिट ठरला. आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाच्या नायिके बद्दल सांगणार आहोत.
१३ जुलै २००१ ला तुम बिन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटांमधून अभिनेत्री संदली सिन्हा हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी हा चित्रपट लोकांना खूप आवडला व या चित्रपटातील गाणी आणि नवे चेहरे आज देखील लोकांच्या लक्षात आहेत. तुम बिन या चित्रपटाचे नाव काढताच या चित्रपटातील सुंदर अभिनेत्री संदली सिन्हा डोळ्यासमोर येते. संदली च्या निरागस डोळ्यांनी आणि हास्याने अनेक लोकांच्या मनावर राज्य केले यामुळे ती रातोरात स्टार झाली होती.
तुम बिन या चित्रपटांमध्ये संदली, प्रियांशू चटर्जी, हिमांशू मलिक आणि राकेश वशिष्ठ या अभिनेत्यांसोबत लीड रोलमध्ये दिसली होती. या चित्रपटातून संदली ने संदेश दिला कि ती या इंडस्ट्रीमधून इतक्यात गुमनाम होणार नाही तर खूप काळासाठी येथे तग धरून बसेल. पण तिचे हे विधान कदाचित नियतीला मंजुर नव्हते. हळूहळू संदली चे करिअर ढासळू लागले आणि ती इंडस्ट्री मधून गायब झाली.
तुम बिन या चित्रपटानंतर संदली सिन्हा ला अजून काही चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र या चित्रपटांमध्ये तिची तुम बिन चित्रपटासारखी जादू पाहण्यास मिळाली नाही. ज्यामुळे तिला नंतर साईड रोल मिळू लागले. एका लीड रोल मधून बाहेर येऊन ती कधी साईड हीरोइन म्हणून काम करू लागली हे तिलाच कळले नाही.
पिंजर आणि अब तुम्हारे हवाले वतन साथियो या चित्रपटांमधील संदली चा अभिनय सर्वांना खुप आवडला होता मात्र या चित्रपटांमध्ये तिथे साईड रोल असल्यामुळे तिच्या करिअरवर याचा फारसा फरक पडला नाही. खूप प्रयत्न करून देखील संदली सिन्हा बॉलीवूड मध्ये स्थिर होऊ शकत नव्हती त्यामुळे २००५ मध्ये तिने बिझनेस मॅन किरण सालस्कर सोबत लग्न केले. लग्नानंतर संदली सिन्हा ने ७/८ वर्षांचा ब्रेक घेतला आणि नंतर पुन्हा चित्रपटांमध्ये पुनरागमन केले.
मात्र या वेळेचे तिचे पुनरागमन साऊथ चित्रपटांमधून होते. परंतु तेथेसुद्धा तिच्या हाती हवे तसे यश लागले नाही त्यामुळे ती अजूनही स्वतःचे करिअर पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहे. चित्रपटातील चढउतारामुळे संदली भारतातील सर्वात मोठी बेकरी ब्रँड ‘कंट्री ऑफ ओरिजन’ची फौंडर आहे. संदली आता दोन मुलांची आई आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !