Headlines

या व्यक्तीने प्रियंकाला दिलेत ६० लाख रुपये किंमतीच्या कानातल्या रिंग्ज, जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती !

प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांचे नाते हे आपापल्या परीने खास असते पण जर सासू-सुनेच्या नात्याबद्दल बोलायचे झाल्यास भारतीय संस्कृतीत या नात्याला एका वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. ज्यात कधी सासू खलनायिका असते तर कधी सून. पण तुम्हाला माहित आहे का फक्त सर्वसामान्य लोकांमध्येच नव्हे तर बॉलीवूड जगात सुद्धा सासु सुनेचे आंबट गोड नाते पाहायला मिळते. चित्रपट सृष्टीतील सासू-सुनेच्या नात्याबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये प्रियंका चोपडा आणि तिची सासू डेनिस जोनस यांचे नाव घेतले पाहिजे.
प्रियंका तिच्या सासू-सासर्‍यांची खूप लाडकी सून आहे. प्रियांकाचे तिच्या सासू सोबत खूप घट्ट बॉण्डिंग आहे. आणि का असू नये ती त्यांची फेवरेट आहे. त्या दोघींचे विचार खुप मिळतेजुळते आहेत. एवढेच नव्हे तर बऱ्याचदा या दोघेही पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात जेथे या दोघींमधील मजबूत कनेक्शन दिसते.

प्रियंका चोपडाच्या सासूचा नुकताच ५४ वा वाढदिवस झाला.  या खास दिवशी प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर तिच्या सासू सोबतचा एक सेल्फी पोस्ट केला. या फोटोमध्ये दोघीही खूप सुंदर दिसतात. या फोटोखाली प्रियंकाने कॅप्शन मध्ये लिहिले की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी. तुम्ही माझ्यावर करत असलेल्या दयेबद्दल आणि प्रेमाबद्दल खूप तुमचे खूप आभार. आज तुम्ही इथे आहात या मुळे मी खूप खुश आहे. तुमचा वाढदिवस आपण एकत्र साजरा करणार आहोत. खूप खूप प्रेम. या पोस्टला प्रियांकाने तिच्या पतीला म्हणजेच निक जोनस ला सुद्धा टॅग केले आहे.
प्रियंकाच्या सासू चे पूर्ण नाव डेनिस मिलेर जोनस असे आहे. त्या पेशाने एक शिक्षिका आहेत. प्रियंकाच्या या पोस्टने सासु सुने मध्ये किती चांगली बॉडिंग आहे आणि प्रियंका तिच्या परिवारासोबत किती खुश आहे हे दिसून येते. लग्नानंतर प्रियांका अधिकतर अमेरिकेमध्ये जास्त असते. या दिवसात सुद्धा ती तिच्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. प्रियंकाची सासू अनेकदा तिला महागडे गिफ्ट देत असते यावरून ती तिच्या सासू-सासर्‍यांची किती लाडकी आहे याचा अंदाज बांधता येतो.
काही दिवसांपूर्वीच प्रियंकाच्या सासूने प्रियांकाला डायमंड इयररिंग्स गिफ्ट केले होते या इयररिंग्स ची किंमत ७९,५०० अमेरिकन डॉलर म्हणजेच साठ लाख रुपये इतकी होती.
एवढेच नव्हे तर प्रियांका च्या लग्नात तिच्या सासूने तिला खास हाताने तयार केलेला दागिना सुद्धा गिफ्ट केला होता या दागिन्याची किंमत एका घराच्या किमती एवढी होती. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की या सासु सुनेत किती प्रेम आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !