Headlines

काजोल मधील ही गोष्ट अजिबात आवडत नाही, अजय देवगणने केला पहिल्यांदाच खुलासा !

बॉलीवुड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल हे दोघेही बॉलीवूड चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडपे आहेत.
या दोघांना या चित्रपटसृष्टीत विशेष अशी एक ओळख आहे ती म्हणजे अजय देवगण म्हंटला की लोकांच्या समोर त्याच्या “सिंघम” या चित्रपटातील भूमिका नजरेसमोर येते, “आता माझी सटकली” हा संवाद प्रेक्षकांच्या काळजात कोरला गेलेला आहे आणि काजोलच्या बाबतीत बोलायचे झाल्यास “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या चित्रपटातील सर्वांची लाडकी गोंडस सिमरन ही लगेच नजरेसमोर येते.
दोघांच्या लग्नाला आता २० वर्षे पेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे तरीही या दोघांमधील प्रेम जरासे सुद्धा कमी झालेले नाही उलट दिवसेंदिवस हे प्रेम वाढतच चालले आहे. अजय देवगणने नुकताच एका गोष्टीचे खुलासा केलेले आहे ते म्हणजे अजयला एक अशी गोष्ट आहे, जी काजोलबद्दल अजिबात आवडत नाही. चला तर जाणून घेऊया नेमकी ती कोणती गोष्ट आहे जी अजयला आवडत नाही.
अजय देवगण आणि काजोल दोघेही एकमेकांच्या सकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी यांचा स्वीकार करतात असे असून सुद्धा अजय देवगन एक खुलासा केलेला आहे की त्यांना नेमकी कोणती गोष्ट काजोल बद्दल आवडत नाही. काजोल सोबत आयुष्य व्यतीत करत असताना अजयने काजोल बद्दलची एक गोष्ट सुद्धा सांगितली जी त्याला खूप त्रास देते.

अजयने सांगितले की, काजोलला मर्यादेपेक्षा जास्त बोलायची सवय आहे. या सवयीचा अजयला नेहमी त्रास होतो तसेच अजयने हे सुद्धा सांगितले की जेव्हा काजोल माझ्या सोबत बोलत नाही तेव्हा काजोलच्या जास्तीत जास्त बोलण्याच्या सवयीची मला आठवण येत असते.
फिल्मफेयरला अजय देवगणने सांगितले की ती चित्रपट सेटवर खूप बडबड करत असते. जेव्हाही तुम्ही काजोलला शांत बसायला सांगाल तेव्हा ती नेमके काहीतरी दुसरेच गोष्ट करत असते. मी तिच्या जास्त बोलण्याच्या सवयीबद्दल नेहमी तक्रार करत असतो पण जेव्हा ती शांत बसते तेव्हा तिच्या शांत बसण्याचे नेमकं कारण काय आहे याच्या बद्दल सुद्धा विचारपूस करत असतो. म्हणून मला काहीच बदलू नये असे वाटते.
अजय देवगण पुढे हेच सांगितले कि, काजोल सोबत काम करताना मला नेहमी चांगले वाटते तसेच अजयने सांगितले की आपण सगळे जाणताच की ,काजोल हि एक उत्तम कलाकार आहे आणि तिच्या अभिनयाने ती प्रेक्षकांवर जादू करत असते. एक कलाकार म्हणून तिच्यासोबत काम करणे हा अनुभव माझ्यासाठी नेहमी पर्वणीच ठरतो. ती माझी पत्नी आहे आणि तिच्यासोबत काम करताना मी नेहमी खुश असतो.
आपणास सांगू इच्छितो की, हे दोन्ही आपल्याला चित्रपट तानाजीमध्ये दिसले होते. या चित्रपटात काजोलने जबरदस्त सहकलाकाराची भूमिका साकारली होती. एकंदरीत ११ वर्षांनंतर या जोडप्यांनी एकमेकांसोबत चित्रपटात काम केले. या चित्रपटात अजय देवगणने नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती आणि काजल हिने पत्नीची भूमिका साकारली होती या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती तसेच वर्षभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये स्थान प्राप्त केले होते.
या आधी सुद्धा अजय आणि काजोल यांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. यू मी और हम, इष्क, प्यार तो होना हि था, दिल क्या करे, राजू चाचा इत्यादी आणि आता तानाजी हा चित्रपट. या दोघांचे चित्रपट आज सुद्धा प्रेक्षक तेवढ्याच आतुरतेने पाहतात जेवढे आधी पाहत असे. म्हणूनच बॉलिवूड क्षेत्रातील हि सर्वांची नेहमी आवडती जोडी ठरते.
आपल्याला हा लेख आवडल्यास लाइक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.