तांदूळ म्हटलं की पहिला आठवतो तो भात. भाताचे अनेक प्रकार आपण पाहतो, त्याचा स्वादही घेतो. उकडीचे तांदूळ, बासमती, कोलम असे अनेक प्रकारचे तांदूळ उत्पादित केले जातात. परंतु छत्तीसगड राज्यामधील शेतकऱ्यांनी काळे तांदळाची शेती करण्यास सुरुवात केली. आणि या काळात तांदळाच्या शेतीचा त्यांना बर्याच मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळतो आहे. आपल्या देशातच नाही परंतु विदेशातूनही या काळ्या तांदळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. छत्तीसगडमध्ये आत्तापर्यंत शेतकरी पारंपरिक धान यांची शेती करत आले होते. परंतु दोन वर्षांपूर्वी एका डुकरी गाव विकास शिक्षण समिती नावाच्या सेवाभावी संस्थेने या दिशेने प्रयत्न सुरू केले. याची सुरुवात छत्तीसगड मधील कोरबा जिल्ह्यातील करतला भागापासून सुरुवात झाली.
या भागातील काही निवडक शेतकऱ्यांनी दहा एकर मध्ये काळ्या तांदळाची केली. पहिल्याच वर्षात शेतकऱ्यांचे सफेद तांदळाच्या दुप्पट किमतीमध्ये काळे तांदूळ विकले गेले. अशा रीतीने शेतकऱ्यांचा काळे तांदूळ उत्पादित करण्याकडे कल वाढला. पुढील वर्षात हीच शेती शंभर एकर इतक्या भागामध्ये पसरली. जवळजवळ २५ टन काळ्या तांदळाचे उत्पादन झाले. या तांदळाचे कोलकत्ता मधील एका कंपनीने पेंटिंग कंपनीने खरेदी केले होते.
जिल्ह्यातील शेतकरी फार उत्साहीत झाले आहेत. आता ११२ शेतकरी जवळजवळ २५० एकर मध्ये काळ्या तांदळाची शेती करीत आहेत. येथून ५० टन काळा तांदूळ उत्पादित होतो. बुखरी गाव विकास शिक्षण समिती नावाच्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत सोलखे यांनी सांगितले की, नाबार्डकडून मिळालेल्या या पद्धतीच्या ट्रेनिंग नंतर शेतकऱ्यांनी काळा तांदळाच्या शेतीला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे सोसायटी पॅकेट बनवून देखील विकले जात आहेत. शेतकऱ्यांना शंभर रुपये प्रति किलो इतका नफा मिळत आहे.
बंगालमधील एका कंपनीने २५ टंकाळा तांदळाची मागणी केली आहे. दक्षिण भारतातील काही कंपन्यांनी देखील काळ्या तांदळासाठी संपर्क केले आहेत. मोठ्या शहरांमध्ये हा काळा तांदूळ चारशे रुपये किलो इतक्या किमतीत विकला जात आहे. पांढरा तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ हा फारच फायदेशीर आहे. स्थानिक बाजारांमध्ये जरी हा तांदूळ १५०-२०० रुपये प्रति किलोग्राम विकला जात आहे, परंतु फ्लिपकार्टवर हा तांदूळ ३९९ रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे.
काळ्या तांदळाची मागणीही मोठ्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कार्बोहाइड्रेट युक्त असलेले हे काळे तांदूळ शुगर व हृदय रोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. काळे तांदूळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील नियंत्रित करता येते. त्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याकारणाने ते पचण्यास उपयुक्त असते आणि सोबतच एंटीऑक्सीडेंट तत्त्व असल्याने ते डोळ्यांसाठी देखील उपयोगी ठरते.
छत्तीसगड राज्यांमध्ये काळ्या तांदळाची शेती होणं ही कुठलीही नवीन गोष्ट नाही. याआधी देखील या राज्यांमध्ये काळ्या तांदळाची शेती केली जात होती. परंतु आता ही शेती आधुनिक पद्धतीने केली जात आहे. काळ्या तांदळाला छत्तीसगडमध्ये करियाझिनी या नावाने ओळखले जाते. तांदळाची ही प्रजाती खूप जुनी आहे. याठिकाणी खोदकाम करताना हंडीमध्ये धान्य मिळाल्याची अख्यायिका आहे. या खेळानंतर तिथे काळात आंधळ्याच्या शेतीला सुरुवात झाली. हा तांदूळ खाण्यासाठी दिला जात असे करून त्यांचे आरोग्य सुदृढ राहील.
बुखरी गाव विकास शिक्षण समिती नावाच्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत सोलखे यांनी सांगितले की, सामान्य तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ शिजायला फार वेळ लागतो. जवळ जवळ सहा ते सात तास जर हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला तर तो लवकर शिजतो. इंडोनेशिया सोबतच काही इतर देशांमध्ये देखील या काळ्या तांदळाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना विषाणू मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा सल्ला देत आहेत. काळा तांदूळ हा स्वास्थ्यासाठी अधिक लाभदायक आहे. त्यामुळे केवळ भारतातच नाही परंतु विदेशातूनही या काळ्या तांदळासाठी मागणी वाढत आहे.
कोरबा कृषी विभागाचे सहाय्यक उपसंचालक एमजी शाम कुंवर यांनी सांगितले की, काळा तांदळाच्या शेतीचे खूप चांगले परिणाम समोर येत आहेत. करांचा देखील काळा तांदूळ पिकवला कडे कल वाढत चालला आहे. काळ्या तांदळाच्या वेगवेगळ्या चार ते पाच जातींचे उत्पादन केले जात आहे. ९० ते ११० दिवसांमध्ये हा काळा तांदूळ पिकून तयार होतो. काळ्या तांदळाचे उत्पादन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना विभागाकडून मदत केली जात आहे. येत्या काळामध्ये या तांदळाच्या अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे, जेणेकरून त्यांना याचा व्यावसायिक लाभ मिळेल.
काळ्या तांदळाचे होणारे फायदे – • काळा तांदूळ हा असा एकमेव तांदूळ आहे ज्यापासून बिस्किट तयार केले जातात.
• स्वस्त व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. • या काळ्या तांदळामधील फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. • हृदयामधील धमन्यांमध्ये अर्थोस्क्लेरोसिस प्लेक फर्मेशनची संभावना कमी करते, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची संभावना कमी होते. • लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळे तांदूळ अतिशय फायदेशीर ठरतात.
• या तांदळामध्ये असलेल्या फायबर मुळे अन्नपचन व्यवस्थित होते. • काळ्या तांदळामध्ये असलेल्या एंथोसायनिन नावाच्या एंटीऑक्सीडेंटमुळे कार्डियोवेस्कुलर आणि कैंसरसारख्या परम पासून आपले संरक्षण करते. • काळ्या तांदळामधील एंटीऑक्सीडेंट तत्त्वामुळे त्वचा व डोळ्यांसोबत बुद्धीसाठी देखील फायदेशीर असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !