Headlines

या अभिनेत्यांच्या मुली चित्रपटांपासून दूर असतात, मात्र सौंदर्याच्‍या बाबतीत अभिनेत्रींनासुद्धा देतात टक्कर !

बॉलीवूड प्रमाणे साऊथ मधील कलाकार सुद्धा अनेकदा चर्चांमध्ये असतात. साऊथ कडील सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत जे चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या परिवारामुळेसुद्धा चर्चेत असतात. ज्याप्रकारे बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांच्या मुली चित्रपट सृष्टी पासून दूर राहणे पसंत करतात त्याचप्रमाणे साऊथ कडील काही अभिनेत्यांच्या मुलीसुद्धा चित्रपटांमध्ये दिसत नाहीत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मधून साउथ सिनेमांमधील सुपरस्टार कलाकारांच्या मुलीं बद्दल थोडी माहिती देणार आहोत ज्या नेहमीच चित्रपट सृष्टी पासून दूर असतात पण त्यांचे सौंदर्य कोणा अभिनेत्री पेक्षा कमी नाही.
अक्षिता विक्रम –
अक्षिता विक्रम ही किंग, धूल, डेव्हिड आणि आई यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला सुपरस्टार अभिनेता विक्रम यांची मुलगी. अभिनेता विक्रम यांनी १९९२ मध्ये शैलाजा बालकृष्णन यांच्या सोबत लग्न केले. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलाचे नाव ध्रुव कृष्णा असे आहे तो एक अभिनेता हे तर मुलगी अक्षिता ही नेहमीच चित्रपटांपासून दूर राहणे पसंत करते. अक्षिताने मनु रंजीत सोबत लग्न केले.
सुष्मिता आणि श्रीजा –
सुष्मिता आणि श्रीजा या दोघी साउथ इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता चिरंजीवी यांच्या मुली आहेत. अभिनेता चिरंजीवी यांना या दोन मुलीं व्यतिरिक्त एक मुलगा सुद्धा आहे त्याचे नाव रामचरण असे असून तो साउथ कडील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. मुलगा सिनेसृष्टीत काम करत असला तरीही सुष्मिता आणि श्रीजा या दोघीही फिल्मी दुनिये पासून दूर राहतात. या दोघी बहिणी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनासुद्धा मात देतात.
विस्मया –
विस्मया ही साउथ सिनेमांमधील सुपरस्टार मोहनलाल यांची मुलगी आहे. अभिनेता मोहनलाल यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांच्या मुलाचे नाव प्रणव असे आहे. प्रणव सुद्धा साऊथ सिनेमा सृष्टीमधील शानदार कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण मोहनलाल यांची मुलगी विस्मया नेहमीच फिल्मी दुनिये पासून दूर राहते.
कुट्टी सुरुमी –
कुट्टी सुरुमी ही अभिनेता ममुटी यांची मुलगी आहे. कुट्टी सुद्धा फिल्मी दुनिये पासून दूर राहते. पण ममुटी यांचा मुलगा दुलकर सलमान हा साउथ कडील सिनेमां व्यतिरिक्त बॉलीवुड मध्ये सुद्धा दिसतो. कुट्टी सुरुमी ही भलेही फिल्मी पडद्यापासून दूर राहत असली तरीही सौंदर्याच्या बाबतीत कोणा अभिनेत्रींना लाजवेल अशीच आहे.

दिव्या सत्यराज –
दिव्या सत्यराज ही बाहुबली चित्रपटामध्ये कटप्पा ची भूमिका निभावणाऱ्या अभिनेता सत्यराज यांची मुलगी आहे. दिव्या सत्यराज ही एक न्यूट्रिशियनिस्ट आहे. दिव्या सत्यराज तिच्या व्यतिरिक्त सत्यराज यांना एक मुलगा सुद्धा आहे त्यांच्या मुलाचे नाव सिबिराज असे असून तो साऊथ सिनेमांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसतो.
ऐश्वर्या आणि सौंदर्या –
ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोघी साउथ कडील दिग्गज अभिनेता रजनीकांत यांच्या मुली आहेत. या दोघीही चित्रपटांपासून नेहमीच दूर राहिल्या आहेत. सौंदर्याने उद्योगपती विशगन वनांगामुडी सोबत लग्न केले तर ऐश्वर्या साऊथ सिनेमा मधील सुपरस्टार अभिनेता धनुष ची पत्नी आहे. ऐश्वर्या आणि सौंदर्य या दोघीही इतक्या सुंदर आहेत की त्यांच्या समोर चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री देखील फिक्या पडतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !