बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या सौंदर्यावर लाखो लोक फिदा आहेत. सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीमधील मोस्ट फिटेस्ट अभिनेत्री म्हणून दिशा पाटनी ला ओळखले जाते. दिशाचा स्टायलिश अंदाज पण इतर अभिनेत्रीं पेक्षा वेगळा असतो. ती जे काही घालते ती पुढे स्टाईल बनते. दिशा तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर सुद्धा खूप अॅक्टिव असते. अनेकदा ती तिच्या अकाऊंट वरून तिचे डान्स चे किंवा ट्रेनिंग व्हिडिओ शेअर करत असते.
दिशाचे वर्कआउटचे व्हिडिओ सुद्धा इंटरनेट वर व्हायरल होत असतात. टायगर श्रॉफ सोबत दिशा पाटनीचे रिलेशन सध्या इंटनेटवर चर्चेत आहे. तिच्या चाहत्यांना सुद्धा तिची व टायगर ची जोडी खूप आवडते. मात्र या सर्व गोष्टीला दिशा व टायगर ने अजूनही दुजोरा दिलेला नाही. काही रिपोर्ट्स मध्ये तर असेही सांगितले की लॉक डाऊन च्या काळात दिशा टायगर च्या घरी राहायला गेली होती. मात्र खरेतर दिशा स्वतः एका आलिशान अपार्टमेंट ची मालकीण आहे. मुंबईतील सर्वात पॉश एरिया पैकी एक असलेला वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड येथे वास्तू बिल्डिंग मध्ये दिशाचा एक अलिशान फ्लॅट आहे.
तुम्ही हे वाचून नक्कीच थक्क व्हाल की एके काळी दिशा फक्त ५०० रू. घेऊन मुंबईत स्वतःचे करीयर घडवण्यासाठी आली होती. आणि आज ती करोडो रुपयांच्या स्वतः च्या फ्लॅट मध्ये राहते. २०१७ मध्ये दिशाने ५ करोड रुपयांना वास्तू बिल्डिंग मध्ये हा फ्लॅट खरेदी केला होता. वांद्रे या विभागास मुंबईतील स्टार हब म्हणून ओळखले जाते. वास्तू बिल्डिंग मध्येच अभिनेता रणबीर कपूरचा सुद्धा फ्लॅट अाहे.
सी- फेसिंग असलेला हा फ्लॅट दिशा ने तिच्या प्रमाणेच स्टायलिश सजवला आहे. दिशाने तिच्या घराला व्हाईट कलर थीम दिली आहे. घराच्या भिंतीपासून ते दरवाजा पर्यंत सगळीकडे पांढऱ्या रंगाचा सजावटीसाठी वापर केला आहे.
लीविंग रूम मध्ये व्हाइट सोफा ठेवला आहे तर टेबल आणि शोकेस पर्यंत सर्वकाही सफेद रंगाचे आहे. घराचे पडदे सुद्धा क्रीम कलरचे आहेत. घराचे दरवाजे सुद्धा पांढऱ्या रंगाने रंगवले आहेत. तिच्या घराच्या दरवाज्याकडे असलेली जागा ही तिची स्टायलिश फोटो काढण्यासाठी ची आवडती जागा आहे. दिशाने तिचा लिविंग रूम रंगीबिरंगी शोपीस ने सजवले आहे. असे म्हटले जाते की शोपिस खूप महागडे आहेत.
दिशाच्या घरातील बालकणी ला काचेची भिंत तयार केली आहे यावर स्लाइडिंग डोअर लावले आहेत. येथे दिशाने एक ड्रीम कैचर चांगले आहे जे सर्वांची नजर आकर्षित करून घेत असते. बालकनी बद्दल बोलायचे झाल्यास हा भाग घरातील सर्वात सुंदर भागांपैकी एक आहे. बालकनी मध्ये वुडन टैक्शचर वाल्या टाइल्स लावल्या आहेत. तिथे तिने वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावून तो भाग अजूनच सुंदर बनवला आहे.
दिशाने तिच्या बालकनीत एक मोठा स्टायलिश झोपाळा लावला आहे जो तिच्या बालपणी ला अजूनच हटके लुक देतो. मोकळ्या वेळेत या झोपळ्यावर बसायला दिशा ला खूप आवडते. दिशा ने तिच्या बेडरूम ड्रिमी लुक दिला आहे. बेडरूम च्या एका भिंतीवर वेगवेगळ्या आकारांच्या फुलपाखरांचे स्टिकर लावले आहेत. तर मास्टर-वॉल वर हिरव्यागार पानांच्या डिज़ाइनचा वॉल पेपर लावला आहे.
दिशा ही एक प्राणी प्रेमी असून तिच्याकडे एक मांजर आणि दोन कुत्रे आहेत. दिशा ने तिच्या मांजरीचे नावं जैस्मिन ठेवले आहे तर एक कुत्र्याचे नाव बेला आणि दुसऱ्याचे गोकू असे आहे. दिशा तिच्या पेट्स सोबत मस्ती करताना चे अनेक फोटो सोशल मीडिया शेअर करत असते.
मित्रांनो हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका !