Headlines

सूर्यवंशम या चित्रपटात भानुप्रताप ठाकूर यांना विषारी खीर भरवणारा बालकलाकार आज आहे मोठा अभिनेता, जाणून घ्या त्याच्याबद्दल !

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे बरेच चित्रपट अजूनही टीव्हीवर लागले की प्रेक्षक टीव्ही समोर दबा धरून बसतात. अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा चित्रपट मी अनेकदा टीव्हीवर पाहिला असेल. हा चित्रपट टीव्हीवर इतक्यांदा दाखवतात की या चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांच्या तोंडपाठ झाले आहेत.

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट जरी त्या काळी सिनेमागृहात चालला नाही तरी ही टीव्हीवर मात्र सुपर हिट ठरला. ज्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच वर्षी सोनी मॅक्स हे चैनल देखील लॉन्च झाले होते त्यामुळे या चैनल वर सूर्यवंशम हा चित्रपट अनेकदा दाखवला जातो.

सोनी मॅक्सने १०० वर्षांसाठी या चित्रपटाचे राइट्स खरेदी केले होते. यामुळेच हा चित्रपट सारखा सारखा सोनी मॅक्स वर दाखवला जातो. या चित्रपटातील अमिताभ बच्चन व्यतिरिक्त इतर कलाकारांना देखील प्रेक्षकांनी पसंत केले होते.
नायकाच्या पात्रा प्रमाणेच नायकाच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या सौंदर्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले होते. तुम्हाला या चित्रपटातील हिरा ठाकूर या पात्राच्या लहान मुलाची भूमिका साकारणारा बालकलाकार आठवत असेल. या चित्रपटात त्या लहान मुलाने चुकून त्याचे आजोबा भानुप्रताप ठाकूर यांना विषारी खीर खायला दिली होती.

या चित्रपटातील त्या बालकलाकाराला प्रेक्षकांची वाहवा खूप मिळाली. मात्र तुम्हाला माहित आहे का या चित्रपटातील तो लहान मुलगा म्हणजेच अभिनेता आनंद वर्धन आता तेलगू चित्रपटातील नामांकित स्टार आहे !

२१ मे १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशम या चित्रपटातील अमिताभ बच्चन चा डबल रोल मुळे या चित्रपटाचे खूप कौतुक झाले होते तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांच्या नातवाची भूमिका साकारणाऱ्या आनंद वर्धन या बालकलाकाराला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

आनंद वर्धन त्याच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून १९९७ मध्ये आलेल्या प्रियरगालू या चित्रपटातून केली होती. त्या काळात खूप कमी वयात आनंदला बेस्ट चाइल्ड अॅक्टरचा नंदी अवॉर्ड मिळाला. आनंद वर्धन चे वडील चार्टड अकाऊंट होते. ते अनेकदा आनंदला रामायणाच्या कथा ऐकवायचे. याचा फायदा आनंदला आपली संस्कृती जाण्यासाठी झाला.
आनंद बद्दल बोलायचे झाल्यास तो प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर पीबी श्रीनिवास यांचा नातू आहे. श्रीनिवास यांनी आतापर्यंत ३००० हून अधिक गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. लहानपणीच अभिनयक्षेत्रात आनंदने पाऊल ठेवले. बालपणी निरागस आणि गोलू मोलू दिसणारा हा आनंद मोठा झाल्यावर मात्र त्याच्या डॅशिंग पर्सनालिटी मुळे सोशल मीडियावर राज्य करत आहे.

आनंदने आतापर्यंत २० तेलगू चित्रपटांमध्ये काम केले असून त्यातील बरेचसे चित्रपट सुपरहिट ठरले. सध्या बराच काळ आनंद चित्रपट सृष्टी पासून दूर असून स्वतःचा बिजनेस सांभाळत आहे. त्यामुळे त्याचे चाहते अजूनही त्याच्या कम बॅक ची मनापासून वाट पाहत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !