Headlines

टिकटॉक बंद झाल्यानंतर टिकटॉकस्टार ‘युवराज सिंह’ आणि ‘लक्ष्मी अगरवाल’ची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या !

भारत-चीन या दोन देशातील वाद लक्षात घेता भारत देशाने चीनचे ५९ ॲप भारतामध्ये बंद केले आहेत. या बंद केलेल्या ॲप मध्ये सध्या लोकप्रिय असलेला टिक टॉक ॲपसुद्धा सहभागी आहे. काही लोक टिक टॉक टाईमपास’साठी वापरायचे तर काही लोक या ॲप मार्फत व्हिडिओ बनवून लोकांचे मनोरंजन करायचे. एवढेच नव्हे हा ॲप म्हणजे प्रसिद्ध होण्याचा एक सोपा मार्ग होता तर काही लोकांचा रोजीरोटीसाठी चा एकमेव मार्ग होता.
दरम्यान सरकारच्या या निर्णयाचा काही लोकांनी तसेच काही टिक टॉकर्सनी मनापासून स्वागत केले आहे मात्र काही लोक सरकारच्या या निर्णयावर खूप नाराजी व्यक्त करत आहे. या टिक-टॉक ॲप वर व्हिडिओ बनवून काही लोकांनी लाखो रुपये कमावले होते जे आता टिक टॉक बंद झाल्यामुळे बेरोजगार झाले आहेत. या लोकांची मनाची अवस्था जाण्यासाठी एका वेब पोर्टलने काही फेमस टिक टॉकर्स सोबत बातचीत केली ज्यामध्ये त्यांच्या मनातील दुःख समोर आले.
युवराज सिंह –
जोधपूर मधील डान्सर युवराज सिंहच्या परिवाराला तर तुम्ही ओळखत असाल. हा युवराज सिंह सोशल मीडियावर व्हायरल बॉय या नावाने खूप व्हायरल झाला होता. एवढेच नव्हे तर लोक युवराजला इंडियन मायकल जॅक्सन म्हणून ओळखू लागले होते. युवराज चा एक व्हिडीओ अमिताभ बच्चन ने ट्विट केला त्यानंतर तो चर्चेमध्ये आला होता. यानंतर स्वतःच्या टॅलेंटला लोकांसमोर आणण्यासाठी युवराजने टिकटॉक ची निवड केली. या माध्यमातून युवराजला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.
टिक टॉकवर बंदी घोषित झाल्यानंतर युवराजने सांगितले की तो गेल्या वर्षीच टिक टॉक वर आला होता आणि एका वर्षात त्याने सहा मिलियन फॉलोवर्स बनवले होते परंतु त्याने तोपर्यंत या माध्यमातून कोणतीच कमाई केली नव्हती कारण त्याला या माध्यमातून पैसेसुद्धा कमवता येतात हे माहीत नव्हते. युवराज ने पुढे सांगितले की टॅलेंटवर कोणी दबाव आणू शकत नाही. टिक टॉक बंद झाले म्हणून काय झाले आम्ही दुसऱ्या माध्यमातून आमचे टॅलेंट सर्वांसमोर आणू आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनावर राज्य करू.

लक्ष्मी अग्रवाल –
ऍ सि ड अ टॅ कची शिकार झालेली आणि टिक टॉक वर खूप प्रसिद्ध असलेली लक्ष्मी अग्रवालने याबाबत सांगितले की, जेव्हा मी टिक टॉक वर ॲक्टिव झाले तेव्हा मला असे जाणवले की, येथे तर असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या आयुष्याला खूप कंटाळले आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा निर्णय घेतला की मी अशा लोकांना या माध्यमातून मोटिवेट करीन. गेल्या सात महिन्यांपासून मी येथे जास्त एक्टिव झाली आहे. माझ्या पोस्ट बघून लोकांना आनंद होतो.
टिक टॉकवर लक्ष्मी अग्रवाल चे १.५ मिलियन हून अधिक फॉलोवर्स आहेत. टिक टॉक बंद झाल्यावर लक्ष्मी अग्रवाल लय सांगितले की, सरकारच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते. मात्र सरकारला सुद्धा लोकांमधील या टॅलेंट ला जगासमोर आणण्यासाठी काहीना काहीतरी दुसरे माध्यम आणले पाहिजे. जिथे लोक सिंगिंग डान्सिंग यांसारखे स्किल लोकांसमोर आणून दुनिया समोर प्रसिद्ध होऊ शकतील.

हे वाचा – आम्ही उ ध्व स्त झालो… टिक-टॉक स्टार दिनेश पवारची टिक-टॉक बॅन नंतरची पहिलीच प्रतिक्रिया !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !