Headlines

गायक ‘हिमेश रेशमिया’ यांच्या पत्नीने ‘श्री कृष्णा’ मालिकेत निभावली होती हि भूमिका !

रामायण आणि महाभारत या मालिकांचा पुन्हा प्रक्षेपणानंतर प्रेक्षकांनी श्रीकृष्ण ही मालिका सुद्धा पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली होती. प्रेक्षकांची भरघोस मागणी लक्षात घेता रामानंद सागर यांची श्री कृष्णा ही मालिका पुन्हा एकदा दूरदर्शन वर प्रसारित होणार आहे माहिती वाहिनीने ट्विटरवर दिली.
मात्र ही मालिका नक्की कधी सुरू होईल हे अजून घोषित केलेले नाही. श्रीकृष्णा ही मालिका पहिल्यांदा १९९३ ते १९९६ दरम्यान प्रसारित व्हायची. आता ही मालिका पुन्हा प्रसारित होत असल्यामुळे यातील कलाकार देखील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या कलाकारांमध्ये हिमेश रेशमियाची पत्नी सुद्धा होती हे फारच कमी लोकांना ठाऊक आहे.
हिमेश रेशमिया च्या पत्नीचे नाव सोनिया कपूर असे होते. आज आम्ही या पोस्ट द्वारे तुम्हाला सोन्या कपूर बद्दल थोडी माहिती देणार आहोत. सोनिया ने श्री कृष्णा या मालिकेत कृष्णाच्या बहिणीची म्हणजेच सुभद्राची भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिचा रोल हा छोटासाच असल्याकारणाने ती मालिकेत दोन-तीन एपिसोड मध्येच दिसली होती. श्रीकृष्णा या मालिकेशिवाय सोनियाने अनेक मालिकेत आणि चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे पण आता मात्र ती इंडस्ट्री पासून काहीशी दूर झाली आहे.

हे वाचा – रामायणातील मंदोदरीने पतीच्या निधनानंतर सोडला अभिनय, आता जगण्यासाठी करते हे काम !

सोनियाने किटी पार्टी, आ गले लग जा, पिया का घर, कुसुम, कभी हा कभी ना, सती ….सत्य कि शक्ती, रिमिक्स, बाबुल की दुवाये लेती जा, लव यू जिंदगी, येस बॉस, जय गणेश आणि जय हनुमान या मालिकांमध्ये काम केले होते.
या मालिकांव्यतिरिक्त सोनियाने फरेब, कार्बन आणि ऑफिसर यांसारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या. गेली कित्येक वर्षे सोनिया फिल्म इंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्री पासून लांब आहे परंतु तिचे नाव हिमेश रेशमिया ची पत्नी म्हणून कित्येकदा घेतले जाते.

हे वाचा – रामायण बनवणारे रामानंद सागर यांचे कुटुंब कोठून आले आहे, जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी !हिमेश रेशमिया आणि सोनिया कपूर हे दोघे लग्नाआधी दहा वर्षे एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. २०१८ मध्ये एका वैयक्तिक समारंभाचे आयोजन करून हिमेश आणि सोनियाने लग्न केले. हिमेश रेशमिया चे हे दुसरे लग्न असून त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच कोमलला लग्नानंतर २२ वर्षांनी २०१७ मध्ये घटस्फोट दिला.

हे वाचा – आधी विदुराच्या भूमिकेसाठी निवडले गेले होते महाभारतातील कृष्ण, जाणून घ्या कृष्ण ही भूमिका कशी मिळाली !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *