Headlines

शक्तिमान मालिकेमधील कलाकार काय करत आहेत सध्या, जाणून घ्या !

मित्रांनो “शक्तिमान” ही मालिका टीव्ही वर पाहिली नाही असा माणूस कुठे शोधूनही सापडणार नाही. ह्या मालिकेचा पहिला एपिसोड डीडी १ वर १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आणि ही मालिका जवळपास ८ वर्ष चालली. भारतात टेलिव्हिजन च्या दुनियेतील पहिला सुपरहिरो म्हणून शक्तिमान ची ओळख आहे.
अगदी लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत सर्वच वयोगटातल्या लोकांना ह्या मालिकेने वेड लावले होते. ह्या मालिकेचे कॉमिक बुक्स ही बाजारात आले होते. ही मालिका बंद होऊन जवळपास १५ वर्ष झाली आहेत. आणि आता लोकआग्रहास्तव लॉकडाऊन मध्ये ती परत सुरु होणार आहे. हि मालिका DD नॅशनल वरती दुपारी १ वाजता, २ एप्रिल पासून सुरु होईल. त्याच निमित्ताने आम्ही तुम्हाला शक्तिमान चे कलाकार सध्या काय करतात ह्याची सफर घडवणार आहोत.
१)मुकेश खन्ना, शक्तिमान – सुरुवात करूया शक्तिमान मालिकेतला सर्वांचा आवडता सुपरहिरो शक्तिमान म्हणजे गंगाधर शास्री. गंगाधर ही शक्तिमान है, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ह्या शक्तिमानची भूमिका केली आहे मुकेश खन्ना ह्यांनी. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्वतः मुकेश खन्ना हे शक्तिमान मालिकेचे निर्माते असून त्यांनी त्यांच्या मुलांना टीव्ही वर सुपरहिरो शो बघत असताना शक्तिमान बनवण्याची कल्पना सुचली.
शक्तिमान मालिकेतली खास गोष्ट म्हणजे त्याच्या प्रत्येक एपिसोड मध्ये तो नवीन व्हिलन शी फाईट करतो तसेच त्याच्या प्रत्येक एपिसोड मधून एक सामाजिक संदेश आपल्याला मिळतो. मुकेश खन्ना शेवटचे प्यार का दर्द है ह्या हिंदी मालिकेमध्ये दिसले होते. शक्तिमान ह्या मालिकेनंतर त्यांनी “हेरा फेरी” ह्या चित्रपटामध्ये काम केले होते.
त्यानंतर मुकेश खन्ना टीव्ही वर खूपच कमी दिसले. त्यांनी हल्लीच स्वतःचा युट्युब चॅनेल सुरु केला आहे. त्या चॅनेल द्वारे ते विविध सामाजिक विषयांवर बोलत असतात. हल्लीच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी शक्तिमान २ बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
२) वैष्णवी मर्चंट, गीता विश्वास – मित्रांनो ह्या मालिकेतली ती साहसी पत्रकार तर तुम्हाला आठवतच असेल. ह्या मालिकेमध्ये शक्तिमान आणि गीता विश्वास मधले प्रेम संबंध दाखवण्यात आले आहेत. गीता ची भूमिका केलेल्या वैष्णवी मर्चंट हिला ही ह्या मालिकेमुळे फार लोकप्रियता मिळाली.
जेव्हा शक्तिमान मालिकेतून गीताला वगळण्यात आले तेव्हा प्रेक्षकांकडून निर्मात्यांविरोधात प्रदर्शने करण्यात आली होती. वैष्णवी तेव्हा काही चित्रपटांमध्येही व्यस्त झाली होती.
छुना है आसमान, सपने सुहाने लडकपन के, टष्न-ए-इश्क मध्ये वैष्णवी ने मुख्य भूमिका केल्या आहेत. वैष्णवी ला तुम्ही सध्या दिव्या द्रुष्टी आणि ये उन दिनो कि बात है ह्या मालिकांमध्ये पाहू शकता.
३) सुरेंद्र पाल, ताम्राज किलविष – ह्या मालिकेतला सर्वात महत्वाचा ज्याच्यामुळे शक्तिमान पूर्णच होऊ शकत नाही असा शक्तिमान मालिकेतला मुख्य व्हिलन म्हणजे ताम्राज किलविष. ताम्राज ची भूमिका केली आहे सुरेंद्र पाल ह्यांनी. सुरेंद्र पाल ह्यांना खूप कमी लोकं ओळखत असतील.
सुरेंद्र पाल अनेक वर्ष चित्रपट सुष्टीत काम करत असून त्यांनी खुदा गवाह, सेहर सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी महाभारत ह्या लोकप्रिय मालिकेमध्ये द्रोणाचार्यांचीही भूमिका केली होती. तसेच ते आशुतोष गोवारीकर ह्यांच्या जोधा अकबर चित्रपटातही दिसले होते. हल्लीच ते “मेड इन हेवन” ह्या वेबसिरीज मध्ये दिसले होते.
४) ललित परीमू , डॉक्टर जॅकाल – शक्तिमान मालिकेतले डॉक्टर जयकाल जे एक शास्त्रज्ञ म्हणून दाखवले आहेत ते ललित परीमु ह्यांची ह्या मालिकेमध्ये खूप महत्वाची भूमिका होती.
डॉक्टर जॅकाल ह्या मालिकेतला व्हिलन ताम्राज साठी काम करताना दाखवलं आहे. ललित परीमु शेवटचे “मुबारकन” ह्या विनोदी चित्रपटामध्ये दिसले होते. तसेच ते “केसरीया बालम आओ हमारे देस” ह्या मालिकेमध्येही दिसले होते.
५) टॉम अल्टर, महागुरू – शक्तिमान मालिकेत महागुरूंची भूमिका केलेले टॉम अल्टर सर्वानाच माहिती असतील. ह्या मालिकेमध्ये टॉम अल्टर ह्यांनी ही भूमिका खूप चांगली निभावली होती.
एफ.टी.आई आई मधून बाहेर पडल्यानंतर टॉम अल्टर ह्यांना पहिला ब्रेक देव आनंद ह्यांच्या साहेब बहादूर चित्रपटामध्ये मिळाला. टॉम अल्टर ह्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून ते भारत एक खोज, जुनून, जबान संभालकें सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.
तसेच त्यांनी गांधी, शतरंज के खिलाडी, क्रांती, आशिकी, परिंदा सारख्या चित्रपटामुळे ओळखले जातात. वयाच्या ६७ व्या वर्षी २०१७ मध्ये टॉम अल्टर ह्यांचे त्वचेच्या कॅन्सर मुळे निधन झाले. लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करायला विसरू नका. तसेच तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *