बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जेव्हा ते इंडस्ट्रीमध्ये नवीनच आले होते तेव्हा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. यातच जर प्रियंका चोपडा बद्दल बोलायचे झाल्यास जेव्हा ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन आली होती तेव्हा तिला सुद्धा वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक भेटले होते. एकदा एका शोमध्ये प्रियांकाने सांगितले होते की कशाप्रकारे दिग्दर्शकाने तिला टक्कर दिली होती आणि त्या दिग्दर्शकाने खूप अश्लील गोष्ट प्रियंकाला सांगितली जी प्रियंकाच्या मनाला खुप टोचली.
प्रियांकाने सांगितले की एकदा ती एका अशा डायरेक्टर बरोबर काम करत होती, ज्याचा गळा दाबण्याची तिची मनोमन इच्छा व्हायची. मी एक मुलगी असल्यामुळे माझ्यासोबत हे असे घडले पण आता मी ते विसरणार नाही. मी कोणत्या फिल्मी बॅकग्राऊंड मधून आलेली नाही शिवाय या इंडस्ट्रीमध्ये माझा गॉडफादर सुद्धा नाही. त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही एकटी मुलगी असतात लोक त्याचा गैरफायदा घेतात. त्यावेळी माझ्या डोक्यावर सुद्धा कोणाची छत्रछाया नव्हती.
मात्र माझ्या आईवडिलांनी मला काही तत्वांवर वाढवले सोबतच प्रियांकाने सांगितले की, अशा प्रकारच्या गोष्टी माझ्यासोबत अनेकदा घडल्या त्यामुळे तो चित्रपट सोडून तेथून निघून जायची. मी खूप आत्मसन्मान जपणारी मुलगी आहे. माझा आत्मसन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रियांकाने सांगितले की जेव्हा त्या दिग्दर्शकाने माझ्यासोबत अश्लीलतेने बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी मी नुकतीच चित्रपटांमध्ये काम करू लागली होती.
त्यावेळी तो दिग्दर्शक माझ्या ड्रेस डिझायनर सोबत बोलत होता. कदाचित त्या दिग्दर्शकाला ठाऊक होते की मी त्यांच्या जवळच उभी आहे. त्यावेळी त्या डिझायनरने खूप चीप गोष्ट बोलली की, ‘ ड्रेस इतका छोटा हवा की…….’ ते वाक्य खूपच वाईट होते. त्यावेळी अक्षरशहा माझे डोके फिरले. त्या चित्रपटाचे दोन दिवसाचे शूटिंग झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी आली.
इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्याकारणाने माझ्याकडे इतके पैसे सुद्धा नव्हते. त्यामुळे घरी येऊन मी माझ्या आईला सांगितले की आपण त्यांना त्यांची सायनिंग अमाऊंट परत देऊयात तसेच या दोन दिवसात जेवढा खर्च झाला आहे तो सुद्धा परत देऊयात. कारण मला हा चित्रपट करायचा नाही त्यामुळे मी हा चित्रपट सोडत आहे. कदाचित त्या दिग्दर्शकाला सुद्धा माहीत नव्हते की मी असे का करत आहे. पण जर आता हा शो ते दिग्दर्शक बघत असतील तर त्यांना त्यांचे कारण नक्कीच मिळेल. त्यानंतर मी त्यांच्यासोबत कधीच पुन्हा काम केले नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !