या आहेत बॉलिवूडच्या खलनायकांच्या पत्नी, काही आहेत अभिनेत्री तर काही राहतात फिल्म इंडस्ट्री पासून दूर !

774

बॉलीवूड मध्ये काही वेळेस प्रमुख अभिनेत्यांपेक्षा चित्रपटातील खलनायकाचे पात्र जास्त गाजते. चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिका साकारणारे हे कलाकार त्यांच्या खर्‍या आयुष्यात मात्र एकदम विरुद्ध आहेत. मात्र प्रेक्षकांच्या मनात यांची छाप एक विलन म्हणूनच राहते. हिरोंच्या पत्नीबद्दल तर तुम्ही जाणता. पण या खलनायकांच्या पत्नीबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे खलनायकांच्या पत्नींबद्दल सांगणार आहोत.‌
१) शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर –
बॉलीवूड मध्ये आऊ लॉलीता या डायलॉग मुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेता शक्ती कपूर च्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर असे आहे. शिवांगी या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी यांची सख्खी बहीण. बहिण, नवरा आणि मुलगी जरी इंडस्ट्रीमधील कलाकार असले तरीही शिवांगी लाईमलाईट पासून दूर राहणे पसंत करते. शिवांगी चा स्वभाव शक्ती कपूरच्या एकदम विरुद्ध आहे.
२) आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे –
आशुतोष राणा यांच्या चित्रपटातील अभिनयाचे कौतुक हे दरवेळी होतच असते. आशुतोष यांची गिनती बॉलीवूड मधील खतरनाक खलनायकांमध्ये केली जाते. आशुतोष राणा यांची पत्नी रेणुका शहाणे ही सुद्धा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. हम आपके है कौन या चित्रपटात रेणुका यांनी माधुरीच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
३) प्रकाश राज आणि पोनी वर्मा –
साऊथ इंडस्ट्री पासून ते बॉलीवुड पर्यंत आपल्या अदाकारीने सर्वांना घायाळ करणारा अभिनेता प्रकाश राज याचे नाव सुद्धा इंडस्ट्री मधील खतरनाक खलनायक मध्ये घेतले जाते. प्रकाश राज ची पत्नी पोनी वर्मा ही बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आहे.
४) निकितन धीर आणि कृतिका सेंगर –
दीपिका पादुकोण आणि शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेस मधील थंगबली तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या अभिनेत्याचे नाव निकितन धीर असे आहे. निकितनने टेलिव्हिजन अभिनेत्री कृतिका देसाई सोबत लग्न केले. कृतिका ला टीव्हीवरील झांसी की रानी या मालिकेमुळे ओळखले जाते. या मालिके व्यतिरिक्त सुद्धा तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !