बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांचे टॅलेंट आणि सौंदर्य दाखवण्यासाठी खूप रक्कम घेतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलीवूड मध्ये भरपूर नाव कमावले आहे. मात्र नाव कमावतानाच या अभिनेत्रींनी बक्कळ पैसा कमावला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगत आहोत ज्या एका चित्रपटात काम करण्यासाठी करोडो रुपये घेतात.
१) कंगना राणावत –
आपण सर्वांनीच कंगनाचा उत्कृष्ट अभिनय पाहिलाच आहे. आजच्या काळात कंगणा ही सर्वात महागडी अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटात काम करण्यासाठी २७ करोड रुपये घेते. एवढेच नव्हे तर ती तीन वेळा भारताचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित सुद्धा झाली आहे. आजच्या घडीला कंगना राणावत बॉलिवूडमधील हायेस्ट पेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कंगनाचा नुकताच मणिमर्णिका हा झाशीच्या राणी वर आधारित चित्रपट येऊन गेला.
२) दीपिका पादुकोण –
बॉलिवूडमध्ये दीपिकासारखे खणखणीत नाणे शोधून सापडणार नाही असे म्हटल्यास काही वावगे ठरत नाही. तिच्या एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेते. तसे पाहायला गेल्यास तिचा अभिनय नेहमीच दमदार असतो याची प्रचीती आपण तिच्या प्रत्येक चित्रपटांमधून घेतो. दीपिका पादुकोण तिच्या एका चित्रपटासाठी २६ करोड रुपये चार्ज करते. तिच्या सौंदर्या सोबतच अभिनयाचे देखील इतके चाहते आहेत की त्यांची संख्या आता लाखो करोडोंच्या घरात पोहोचली आहे. ४ एप्रिल रोजी दीपिकाचा रणवीर सिंह सोबत ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र लॉक डाऊन मुळे चित्रपट गृहे बंद असल्या कारणाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात दीपिकाने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका केली आहे.
३) प्रियंका चोपडा –
बॉलीवूड पासून ते हॉलीवुड पर्यंत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारी प्रियंका चोपडा कोणा इतर अभिनेत्री पेक्षा कमी नाही. तिचे लाखो दीवाने आहेत. प्रियांकाने बॉलिवूडमधील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. लोक तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचा सुद्धा प्रेमात पडतात. प्रियांका तिच्या एका चित्रपटासाठी २१ ते २५ करोड रुपये चार्ज करते. २०१८ मध्ये प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनस सोबत लग्न केले. सध्या ती तिच्या पतीसोबत लॉस एंजलिस मध्ये राहते. सर्वात शेवटी प्रियांका द स्काय इज पिंक या चित्रपटात दिसली होती.
४) करीना कपूर खान –
बेबो या नावाने इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असलेली आणि सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री करीना कपूर खान वर लोक भरपूर प्रेम करतात. करीना नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आतापर्यंत करिनाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करीना एका चित्रपटासाठी २० ते २३ करोड रुपये फी घेते. एवढेच नव्हे तर करीनाला ६ वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
५) श्रद्धा कपूर –
स्वतःच्या क्युटनेस मुळे सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर ने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लोक श्रद्धाला खूप पसंत करतात. श्रद्धा कपूर हिट बॉलीवूड मधील खलनायकी भूमिका साकारणाऱ्या शक्ती कपूर यांची मुलगी आहे. सध्या श्रद्धा कपूर आघाडीच्या अभिनेत्रींनी पैकी एक बनली आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी २३ करोड रुपये चार्ज करते.
६) आलिया भट –
आज कालच्या तरुणांच्या तोंडात सतत नाव असणारी अभिनेत्री म्हणजेच आलिया भट. आलिया तिच्या निरागस हास्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. लोकांचे तिच्यावर खूप प्रेम असल्यामुळे तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. आलिया भट तिच्या एका चित्रपटासाठी २१/२२ करोड रुपये निर्मात्याकडून घेते. या वर्षी डिसेंबर महिन्यात आलियाचा रणबिर कपूर सोबत ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !