Headlines

लीक झाली पुष्पा २ ची स्टोरी, श्रीवल्लीच्या सोबत पार्ट २ मध्ये काय अघटीत घडणार पहा !!

साऊथकडील सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा-द राइज हा सिनेमा प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरला. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने सुद्धा खूप चांगली कमाई केली. या चित्रपटातील रश्मिका मंदानाच्या श्रीवल्ली या पात्राचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. पहिला पार्टला पंसती मिळाल्यामुळे प्रेक्षक आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत आहे. पण या चित्रपटासंबंधित एक माहिती समोर आली आहे. त्यात पुष्पा 2 चित्रपटात श्रीवल्लीचा मृत्यू होणार असल्याचे दाखवले जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचे मेकर्स रश्मिकाचा रोल छोटा करण्याचे प्लॅनिंग करत आहे. चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी या चित्रपटाच्या टीमला मजबूत कथा हवी होती. त्यासाठी पुष्पाचे दुश्मन श्रीवल्लीला मारून टाकणार आहेत. हे काम SP भंवर सिंह म्हणजेच फाहद फासिलकडुन होईल.

श्रीवल्लीच्या मृत्यूनंतर पुष्पा तिच्या मृत्यूचा बदला घेताना दिसेल. अशा प्रकारे कहाणी पुढे नेण्यात येईल. पण याबाबत अजून कोणतेही स्पष्टीकरण झालेले नाही. ताज्या माहितीनुसार पुष्पा 2 ची स्क्रिप्ट पुर्ण झाली असून जुलै महिन्यापासून त्याचे शूटिंग सुरु होईल.

तसेच पुष्पाच्या मेकर्सनी RRR आणि KGF 2 ची सफलता पाहून पुष्पा 2 च्या कहाणीत बदल केल्याचे म्हटले जात आहे. पुष्पा 2 हा चित्रपट या वर्षाअखेरीस किंवा पुढच्या वर्षी प्रदर्शित होऊ शकतो. पुष्पा 2 ची कथा पहिल्या भागाप्रमाणेच दमदार असणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !