Headlines

टिव्हीवर खळखळून हसायला लावणारे हे कलाकार एका शोसाठी घेतात एवढी फी !

सध्या टीव्हीवर दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी काही हास्य मनोरंजनाचे कार्यक्रम दाखवले जातात. या कार्यक्रमातील कलाकार हे इतर मालिकांमधील कलाकारांनी प्रमाणेच स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. या विनोदी कलाकारांची कमाई बॉलीवूड मधील सुपरस्टार्स पेक्षा काही कमी नाही.
हे कलाकार टीव्ही मालिका अवॉर्ड फंक्शन आणि अन्य काही इव्हेंटमध्ये निवेदन करताना दिसतात. फोर्ब्स ने नुकतीच टॉप १०० विनोदवीरांची यादी जाहीर केली. यात काहींना स्वतः चे नाव सहभागी करण्यात यश आले. आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे हे कलाकार एका होस्टिंग साठी किती फि घेतात त्याबद्दल माहिती देणार आहोत.
१) कपिल शर्मा –
टीव्हीवरील कॉमेडी शो मधून स्वतःची ओळख निर्माण करणारा कपिल शर्मा हे नाव आज एक ब्रँड झाले आहे. कपिल शर्मा एका शोसाठी 70 ते 80 लाख रुपये फी घेतो. फोर्ब्स नुसार कपिल शर्मा ११ व्या स्थानावर आहे.
२) कृष्णा अभिषेक –
टिव्ही शो मधून स्वतःचे नाव कमावणारा हा दुसरा अभिनेता. कृष्णा एका शो साठी ३५ ते ४० लाख रुपये फी घेतो. कृष्णाने आतापर्यंत अनेक टिव्ही शो आणि इव्हेंट होस्ट केले आहेत.
३) भारती सिंह –
भारती सिंह ही टिव्ही वरील पहिली महिला कॉमेडियन आहे. हिने सर्वांना दाखवून दिले की या क्षेत्रात महिला सुद्धा मागे नाहीत. नच बलिये सीजन ८ मध्ये भारती ही सर्वाधिक फी घेणारी सेलिब्रिटी होती. भारती एका शो साठी २५ ते ३० लाख रुपये फी घेते.

हे वाचा – रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची संपत्ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल !४) सुनील ग्रोवर –
टीव्हीवरील गुत्थी आणि डॉ. मशहूर गुलाटी या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील ग्रोवर याने एक विनोदवीर म्हणून खूप नावं कमवले. सुनीलने अनेक मालिका व अवॉर्ड फंक्शन होस्ट केले आहेत. सुनील एका शो साठी १५/१६ लाख रुपये फी घेतो.
हे वाचा – अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?
५) सिद्धार्थ सागर –
टिव्ही वरील मावशी या भूमिकेमुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता सिद्धार्थ सागर हा प्रेक्षकांना खूप आवडतो. याने देखील अनेक शो होस्ट केले आहेत. सिद्धार्थ सागर एक शो होस्ट करण्यासाठी १२/१४ लाख रुपये फी घेतो. सिद्धार्थ ने कॉमेडी के फटके, कॉमेडी सर्कस आणि कॉमेडी नाईटस् लाईव्ह यांसारख्या शो मध्ये काम केले आहे.

हे वाचा – कधी एकेकाळी वडिलांनी धूडकावून लावली होती सलमान बरोबर लग्नाची ऑफर, आता लॉक डाउनमध्ये घरात बसून करत आहे हे काम !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *