बॉलिवूडमधील सर्वच कलाकार सध्या या दिवसात सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह दिसत आहेत. हे कलाकार त्यांच्या फॅन्स जोडून राहण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. तसेच स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी काही ना काही गोष्टी करून त्या सोशल मीडियावर शेअर करताना हे कलाकार दिसत आहेत. नुकतेच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ने सुद्धा असे काही केले ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चला तर मग जाणून घेऊया जॅकलीनने नक्की काय केले.
जॅकलीनने तिचे तिच्या बेडरूममधील फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत ते पाहून तिचे फॅन्स खूप चकित झाले आहेत. जॅकलीन ने हे फोटो पोस्ट करताच सोशल मीडियावर ते ताबडतोब व्हायरल झाले. यामध्ये तिने तिच्या बेडरूम मधून मॉर्निंग सेल्फि घेतल्याचे दिसते.
या फोटोमध्ये जॅकलीन तिच्या बेडवर बोल्ड पोज देताना दिसते. या फोटोमध्ये जॅकलीन च्या मागे असलेल्या खिडकीमधून सूर्यप्रकाश येत आहे. ज्याच्या पुढे जॅकलीने पोज घेऊन फोटो काढला आहे. जॅकलिनचा हा बोल्ड अवतार सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाला आहे. तिच्या या फोटोवर खूप जणांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. त्या प्रतिक्रियेतून असे दिसून येते की काही जण तिच्या बोल्डनेसचे दिवाने झाले आहेत तर काही तिने लिहिलेल्या कॅप्शनच्या. तिने कॅप्शन मध्ये राईज अँड शाइन असे लिहिले आहे आणि त्यापुढे सूर्याचा ईमोजी सुद्धा टाकला आहे.
सध्या या लॉकडाउनच्या काळात जॅकलीन फर्नांडिस सलमान खानच्या पनवेल येथील फार्महाऊसवर राहत आहे. या फार्म हाऊसवरील काही फोटो आणि व्हिडिओ जॅकलीन याआधीही शेअर केले होते. तसेच या दरम्यान तिने सलमान खान सोबत दोन गाणी सुद्धा रिलीज केली आहेत. या गाण्यातील सलमान आणि जॅकलिन ची केमिस्ट्री खूप चांगली जमली असून ती प्रेक्षकांना सुद्धा आवडत आहे. तसेच हे गाणे सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !