Headlines

KGF चित्रपटाच्या अफाट सफलतेवर करण जोहर यांनी केले धक्कादायक विधान !

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या केजीएफ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई करत १ हजार करोड रुपयांचा टप्पा पार केला. हा चित्रपट अनेक आठवडे चित्रपटगृहात होता शिवाय ओटीटीवर देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. जेव्हा करण जोहरला या चित्रपटाच्या रिव्यू बद्दल विचारले तेव्हा तो सुद्धा रिव्यू पाहून हैराण असल्याचे त्याने सांगितले.

करण म्हणाला की, जेव्हा मी केजीएफचा रिव्यू वाचला तेव्हा मला वाटले की जर आम्ही हा चित्रपट बनवला असता तर कदाचित तो इतका स्विकारला गेला नसता. पण हा चित्रपट पाहून अनेक जण हा उत्सव आहे, पार्टी आहे असे म्हणत आहे. आणि तो आहेचच.मी नक्कीच या चित्रपटाचे खूप कौतुक करीन. मला हा चित्रपट मनापासून आवडला आहे. पण तरीही हा चित्रपट मी बनवला असता तर… ही खंत मनात आहेच.

करण जोहर सध्या त्याच्या प्रोडक्शनच्या जूग जूग जिओ चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय करणचा रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आज़मी अशी स्टार कास्ट असलेला रॉकी और रानी की प्रेम काहाणी हा चित्रपटसुद्धा लवकरच येणार आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ ला प्रदर्शित होऊ शकतो. करणने त्याच्या वाढदिवसाला एका अॅक्शन फिल्मची घोषणा केली. एप्रिल २०२३ मध्ये या चित्रपटाची शूटिंग चालू होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !