Headlines

करिष्मा कपूर च्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, करिश्माने स्वतःच केला खुलासा !

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी म्हणून ओळखली जाते. तिने बॉलिवूडमधील एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूड मध्ये तिचे अनेक चित्रपट हिट ठरले. मात्र सध्या करिष्मा कपूर चित्रपटांमध्ये जास्त ऍक्टिव्ह नसते. तिच्या लग्नानंतर तिने चित्रपट सृष्टी पासून थोडे दूर राहणे पसंत केले होते. कपूर खानदानाची मुलगी आणि बॉलीवूड मधील टॉप अभिनेत्री करिष्मा कपूरच्या वैवाहिक आयुष्यात खूप चढ-उतार आले. करिष्मा कपूरने संजय कपूर सोबत लग्न केले होते. आता मात्र त्यांचा घटस्फोट झाला आहे. ती तिच्या दोन्ही मुलांचे संगोपन एकटी करते.
करिश्माचे वैवाहिक आयुष्य चढ उतारांनी भरले होते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करिष्मा ने तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने सांगितले कि तिचे लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य खूपच भयानक होऊन गेले. लग्नानंतर फक्त तिचा नवरा म्हणजेच संजय कपूरच नव्हे तर तिच्या संपूर्ण सासरची मंडळी तिचा छळ करायचे. एका मुलाखतीत करिश्माने एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला होता. ही गोष्ट ऐकून तुम्ही नक्कीच थक्क होऊन जाल. करिष्मा ने सांगितले की जेव्हा ती आणि संजय हनिमून ला गेले होते तेव्हा संजयने त्याच्या काही मित्रांसोबत करिश्माचा सौदा केला होता. करिश्माने सांगितले की संजयने तिला संपूर्ण एक रात्र त्याच्या मित्रांसोबत घालण्यास सांगितले. जेव्हा ती या गोष्टीसाठी राजी झाली नाही तेव्हा त्याने तिला खूप मारले.
शिवाय करिश्माने हे देखील सांगितले की सासरी तिच्या सासुचा व्यवहार तिच्यासोबत ठीक नव्हता. तिची सासू तिच्यावर कोणत्याही गोष्टीवरून हात उचलायची.‌ एवढेच नव्हे तर संजय त्याच्या भावाला करिष्मा वर नजर ठेवण्यास सांगायचा. करिष्मा ने सांगितले की संजय लहान-सहान गोष्टींवरून हायपर व्हायचा आणि तिला मारायचा. करिश्माने सतरा वर्षांपूर्वी म्हणजेच २००३ ला बिझनेस मॅन संजय कपूर सोबत लग्न केले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचे लग्न यशस्वी होऊ शकले नाही. लग्नानंतर पाच-सहा वर्षातच त्यांच्या नात्यात दरारा येऊ लागला होता. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनीही नाते संपवण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर करिष्मा तिची आई बबिता कडे येऊन राहू लागली. २०१६ या दोघांनी घटस्फोट घेतला. रिपोर्टनुसार या दोघांनी आपापसातील सामंजस्याने घटस्फोट घेतला होता. संजयने पोटगी म्हणून करिष्माला १० करोड रुपये आणि राहण्यासाठी एक बंगला दिला होता. सध्या संजय त्याच्या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च सुद्धा करत आहे. करिश्मा कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने जुडवा, राजा बाबू, हिरो नंबर १, राजा हिंदुस्तानी, दुल्हन हम ले जाएंगे, हम साथ साथ है असे अनेक हिट चित्रपट केले. बॉलीवूड पासून खूप काळ दूर राहिल्यानंतर करिश्माने नुकताच डिजिटल प्लॅटफॉर्म मधून कमबॅक केला आहे. तिने मेंटलहूड या वेब सिरीज मध्ये काम केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *