या कलाकारांच्या प्रेम कहाण्या सुरू झाल्या चित्रपटांच्या सेटवर, नावं पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल !

386

चित्रपटांमधून अनेक प्रेम कहाण्या दाखवल्या जातात त्या बघून दर्शकांच्या मनात येते की असे फक्त चित्रपटांमध्ये घडू शकते. मोठ्या पदांवरील अशा अनेक प्रेम कहाण्या मधील जोड्या या खऱ्या वाटतात. परंतु अशाही काही प्रेम कहाण्या आहेत ज्या मोठ्या पडदा पासून सुरू होऊन खऱ्या आयुष्यात सुद्धा बनल्या आहेत.
आज आपण अशाच काही जोड्यावर नजर टाकणार आहोत ज्यांची प्रेम कहाणी शूटिंगच्या सेटवर सुरू झाली आणि लग्न पर्यंत पोहोचली. म्हणजे आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील खऱ्या प्रेम कहाण्या सांगणार आहोत.
१) अजय देवगन आणि काजोल –
काही वर्षांपूर्वी लोकांनी यांच्या जोडीबद्दल भाकीत वर्तवले होते की यांचे नाते टिकू शकणार नाहीत. अजयचा स्वभाव खूप शांत आणि लाजाळू तर दुसरीकडे काजोल एकदम चुलबुली आणि एकदम बिनधास्त मुलगी. काजल आणि अजय चार वर्ष रिलेशन मध्ये होते त्यानंतर १९९९ मध्ये दोघांनी लग्न केले.
त्यावेळी कॅमेराला लाजणाऱ्या अजयने स्वतःच्या लग्नात फोटोग्राफरला सुद्धा बोलावले नव्हते. अजय आणि काजोल च्या लग्नात काही ठराविक लोकांनाच निमंत्रण दिले होते.
२) अनुष्का शर्मा आणि विराट कोहली –
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे कोणत्या सेटवर नाही तर २०१३ मध्ये एका टीव्ही ऍड च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली.
२०१४ मध्ये जेव्हा विराट साउथ आफ्रिकेहून परत येत होता तेव्हा विराट साठी अनुष्काने स्वतःची कार मुंबई एअरपोर्टवर पाठवली होती. हळूहळू विराट आणि अनुष्का ची प्रेम कहाणी सर्वांपर्यंत पोहोचली आणि डिसेंबर २०१७ मध्ये या दोघांनी लग्न गाठ बांधली.
३) दिलीप कुमार आणि सायरा बानो – 
१९६१ मध्ये आलेल्या जंगली या चित्रपटांमधून सायराने तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्या काळात सायराचे नाव अनेक लोकांशी जोडले गेले होते. त्यातीलच एक नाव दिलीप कुमार सुद्धा होते. मात्र या दोघांच्या वयात २० वर्षांचे अंतर होते. त्यामुळे अनेक लोकांनी हे नाते जास्त काळ टिकू शकणार नाही असे सांगितले.
दुनिया, बैराग आणि गोपी यासारख्या चित्रपटांमध्ये दिलीप कुमार आणि सायनाने एकत्र काम केले होते. या दोघांची सायरा च्या आईने नसीम बानो यांनी ओळख करून दिली होती. लहान वयातच दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडणाऱ्या सायनाने वयाच्या २२ वर्षी १९६६ मध्ये दिलीप कुमारशी लग्न केले. त्यावेळी दिलीप कुमार यांचे वय ४४ होते.
४) सुनील दत्त आणि नर्गिस –
त्यावेळी नर्गिसने आर. के. प्रोडक्शनचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट साईन केले त्यामुळे नर्गिसचे नाव राज कपूर यांच्याशी जोडले जात होते. त्यानंतर मदर इंडिया चित्रपट आला आणि संपूर्ण कहाणी पलटून टाकली.
त्यावेळी मदर इंडियाच्या सेटवर आग लागली आणि त्यामध्ये नर्गिस अडकल्या गेल्या. त्यावेळी सुनील दत्त यांनी एका सुपरमॅन सारखी आगीत उडी मारली आणि नर्गिस यांना वाचवले. इथपासूनच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली आणि १९५८ मध्ये दोघांनी लग्न केले.‌
५) गीता बाली आणि शम्मी कपूर – 
बॉलीवूडचे गोल्डन कपल अशी ओळख असलेल्या गीता बाली आणि शम्मी कपूर यांची प्रेमकहाणी खूप वेगळी आहे. १९५५ मध्ये रानीखेत येथे रंगीन राते या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. येथूनच त्यांच्या प्रेमाचे वारे वाहू लागले.
त्यावेळी शम्मी कपूर यांनी गीता यांना मागणी घातली परंतु गीताने मात्र नकार दिला. तरीही शम्मी यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि गीता लग्नासाठी राजी झाल्या. त्यानंतर ते दोघे मुंबईला आले आणि १९५५ मध्ये दोघांनी लग्न केले.
६) धर्मेंद्र आणि हेमामालिनी – 
वीरू आणि बसंतीने त्यावेळी सर्वांची मने जिंकली होतीच. धर्मेंद्र सर्वात आधी जेव्हा हेमा मालिनी यांना भेटले त्यावेळी त्यांचे आधीच एक लग्न झाले होते. मात्र हेमा यांच्या आईला हेमा व धर्मेंद्र याचे नाते पसंत नव्हते.
त्यांना हेमा साठी जितेंद्र हे योग्य जोडदार वाटत होते. त्यामुळे हेमाच्या आईने जितेंद्र यांच्यासोबत हेमा यांचे लग्न जुळवण्यास सुरुवात केली होती परंतु १९८० मध्ये हेमा चे धर्मेंद्र यांच्याशीच लग्न झाले.
७) रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण –
रणवीर आणि दीपिकाची प्रेम कहाणी ही एकदम फिल्मी आहे. रणवीरच्या आयुष्यात यायच्या आधी दीपिका रणबीर कपूर ची प्रेयसी होती. मात्र नशिबात काही वेगळेच लिहिले होते. जसजसे दीपिका आणि रणवीरने एकत्र चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली तसतसे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडू लागले आणि नंतर दोघांनी लग्न केले.
जितके मोठे बॉलिवुड आहे तितक्याच मोठ्या येथे घडणाऱ्या घटना असतात. बॉलिवुड मध्ये अनेक कलाकारांची प्रेमकहाणी चित्रपटांच्या सेट वर सुरू झाली. यामध्ये अमिताभ बच्चन आणि जया भादुडी , करीना कपूर आणि सैफ अली खान, रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या प्रेम कहाण्या प्रसिद्ध आहेत. २००७ मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ने लग्न केले होते. तर १९८० मध्ये ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनी लग्न केले होते. २०१६ मध्ये बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर ने लग्न केले होते.
लेख आवडला असेल तर लाईक आणि शेयर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.