बजरंगी भाईजान चित्रपटातील आईचे पात्र निभावणारी अभिनेत्री खरी कशी दिसते पहा !

2879

चित्रपटांमध्ये पात्रानुसार नेहमी वेशभूषा केली जाते. मग कधी ती साधी असते, तरं कधी ग्लॅमरस…. आणि आपण अनेकदा ते खरे आयुष्यात देखील असेच असतील, असे समजतो. त्याचप्रकारे बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये मुन्नीच्या आईचे पात्र फार साधे, सरळ असे दाखवले होते.
आपल्याला ही असंच वाटलं की त्या खऱ्या आयुष्यात देखील तितक्याच साधारण वेषामध्ये असतील. पण जेव्हा त्यांचा पाश्च्यात्य वेशातील फोटो पाहतच सर्व थक्क झाले.बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नीच्या आईचे पात्र रंगवलेल्या अभिनेत्रीचे नाव मेहर वीज आहे.

हे वाचा – बॉलिवूडमध्ये येण्यासाठी या अक्टर्सनी सोडल्या या मोठया-मोठ्या नोकऱ्या, जाणून थक्क व्हाल !

खऱ्या जीवनात मेहर विज या खूप मोहक आणि स्टायलिश आहेत. मेहर आधीपेक्षा आता फार सुंदर आणि वेगळ्या दिसतात. त्या सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे फार मोहक, सुंदर व फॅशनेबल फोटो त्या शेअर करतात.
मेहर यांनी अभिनेते मानव विज यांच्यासोबत लग्न केले. मेहर या ३३ वर्षांच्या असल्यातरीही एखाद्या कथेतल्या परीसारख्या दिसतात. मेहर यांनी आमिर खानच्या “सिक्रेट सुपरस्टार” या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. त्यांच्या मोहक सौंदर्यावरून हे नक्की आहे की त्या सौंदर्य आणि स्टाईलच्या बाबतीत इतर अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाहीत.

हे वाचा – आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत आलियाच्या जवळच्या मैत्रिणीकडून नवीनच खुलासा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !