सलमान खान आणि कतरिना कैफ हे एके काळचे प्रसिद्ध कपल म्हणून ओळखले जायचे. आताही त्यांच्या त्या काळच्या अफेअरच्या चर्चा होत असतात. रिल लाइफमधील त्यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडायची. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. त्यामुळे ते लग्न कधी करणार याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. पण तसे काहीच झाले नाही.
अचानक कतरिना विकी कौशलला डेट करत असल्याची बातमी समोर आली आणि ९ डिसेंबर २०२१ ला दोघांनी लग्नही केले. पण सलमान खान मात्र अजूनही अविवाहितच आहे. त्यानंतर सलमान खानने एका मुलाखतीत कतरिना कैफसोबत लग्न न करण्याचं मोठं कारण सांगितलं.
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे नाव बी-टाऊनमधल्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले तरी त्याच्या कतरिनासोबतच्या अफेअरची चर्चा बऱ्याच काळ रंगल्या. चाहत्यांनाही ही जोडी खूप आवडयची. मग ते चित्रपट असो.. किंवा वास्तविक जीवन, दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असायचे. पण कुठेतरी माशी शिंकली आणि दोघांचे अचानक ब्रेकअप झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ आणि सलमान खान जवळपास 7 वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा होत्या. कतरिना कैफने 2003 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने सलमान खानला 2010 पर्यंत डेट केले होते. मात्र, दोघांनीही डेटिंगबद्दल कधीच खुलासा केला नाही. दोघे नेहमीच एकमेकांचे कौतुक करायचे. आजही दोघे चांगले मित्र आहेत.
सलमान खानने एका मुलाखतीत लग्नाबद्दल खुलासा केला होता त्यात तो म्हणाला होता की तो कतरिना कैफशी लग्न करण्यास तयार नाही. कारण स्पष्ट करताना, सलमानने सांगितले की, तो लग्नासारख्या गोष्टीसाठी तयार आहे असे त्याला वाटत नाही, त्याला फक्त वर्तमानात जगायला आवडते.
ब्रेकअपनंतरही कतरिना कैफने सलमानच्या कुटुंबासोबत खूप चांगले संबंध ठेवले आहेत. एवढेच नाही तर दोघांनी एकत्र कामही केले. त्यांनी कधीच त्यांचे वैयक्तिक आयुष्य प्रोफेशनल आयुष्याच्या मध्ये येऊ दिले नाही.
सलमान पुढे म्हणाला की, मी लग्न केले तरी माझे नाव कोणाच्या ना कोणाच्या तरी नावाशी जोडले जाईल त्यापेक्षा लग्न न केलेले बरे. सलमानसोबतच्या नात्यानंतर कतरिना कैफने रणबीर कपूरला डेट करायला सुरुवात केली. या नात्याबद्दलही कतरिनाच्या बाजूने खूप चर्चा रंगली ती अनेकदा रणबीर कपूरचे कौतुक करायची.
या जोडप्याने बराच काळ एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.
कतरिनाने आता बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले आहे. एकदा ‘कॉफी विथ करण’मध्ये विकी कौशलने त्याला कतरिना कैफ किती आवडते हे सांगितले होते. यानंतर हे जोडपे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू झाल्या. अनेकवेळा दोघेही पार्टीत एकत्र स्पॉट झाले होते. नंतर हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिना एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला होता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !