Headlines

‘आर्ची’ अर्थात ‘रिंकू राजगुरू’ आणि ‘लारा दत्ता’ दिसणार या आगामी प्रोजेक्ट मध्ये, जाणून घ्या त्याच्याबद्दल !

सध्याच्या काळात कलाकारांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म हा एक सुवर्णसंधी घेऊन येतो. नव्या कलाकारांपासून ते ट्रेंडच्या बाहेर गेलेले कलाकार म्हणजेच जुने कलाकार या प्लॅटफॉर्म द्वारे पैसा आणि प्रसिद्धी कमावतात. आता लारा दत्ता सुद्धा स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी यामध्ये सहभागी झाली आहे. डिज्नी प्लस हॉट स्टार वीआयपी लवकरच एक वेब सीरीज घेऊन येत आहे. या वेबसिरीस चे नाव हंड्रेड असे असेल.
या वेब सीरीज मध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आणि मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू असून या दोघींचे डिजिटल विश्वात पदार्पण असेल. रिंकू ने मराठी सुपरहिट चित्रपट सैराट मध्ये काम केले आहे. या चित्रपटाचा हिंदी मध्ये रिमेक सुद्धा करण्यात आला. रिमेक झालेल्या हिंदी चित्रपटाचे नाव धडक असे होते. या चित्रपटात शाहिद कपूर चा भाऊ ईशान खट्टर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर यांनी काम केले होते.हंड्रेड ही एक कॉमेडी अँक्शन सिरीज आहे. ही कहाणी दोन वेगवेगळ्या धाटणीच्या महिलां भोवती फिरते. या सिरीज मध्ये मुंबईतील चाळी आणि गॅंग सुद्धा बघायला मिळतील. या सिरिजची संपूर्ण शूटिंग मुंबईतील खऱ्या चाळीत करण्यात आली. या सिरिजचे दिग्दर्शन रुची नारायण, आशुतोष शहा, आणि ताहिर शब्बीर यांनी केले आहे.

वेबसेरीजचा ट्रेलर पहा येथे – रिंकू राजगुरू आणि लारा दत्ता यांच्या हंड्रेड वेबसेरीजचा ट्रेलर !

लारा दत्ता आणि रिंकू व्यतिरिक्त या सिरीज मध्ये करण वाही, सुधांशू पांडे, परमित सेठी , रोहिणी हट्टंगडी, अरुण नलावडे, आणि मकरंद देशपांडे हे कलाकार सुद्धा दिसतील. ही वेब सिरीज २५ एप्रिल ला रिलीज होणार आहे.
याचे ८ भाग असतील. या वेब सिरीजची गोष्ट एका आजारी मुलीची आहे जीच्याकडे जगण्यासाठी शेवटचे १०० दिवस उरलेले असतात. त्यामुळे ती तिच्या उरलेल्या आयुष्यात काहीतर रोमांचित गोष्ट शोधत असते. त्यानंतर तिची नियुक्ती एक अंडर कव्हर एंजट म्हणून एक पोलिस ऑफिसर करते.

हे वाचा – मेकअपचा तिरस्कार करते हि अभिनेत्री पण दिसायला आहे खूपच सुंदर !ही पोलीस ऑफिसर तिच्या प्रमोशन होण्याची वाट पाहत असते. या दोघी स्वतः चे लक्ष गाठण्यास या १०० दिवसांत एकत्र येऊन मेहनत घेतात. यानंतर गोष्ट एका वेगळ्याच ठिकाणी मोड घेते. या सिरीज मध्ये लारा दत्ता ही एसीपी सौम्या शुक्ला हे पात्र साकारत आहे.

हे वाचा – सलमान खान यांच्या वडिलांवर लॉकडाऊन मोडल्याचा ठपका, पण मिळालं हे उत्तर !या सिरीज च्या आठवणी आठवत लारा सांगते की, मी या सिरीज मध्ये काम करण्या मागचे मुख्य कारण म्हणजे मी या आधी कधीच पोलिसांची भूमिका केलेली नाही. यातील माझी भूमिका ही आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्वतः चे अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या मुलीची आहे.
पण या सिरीज मध्ये माझी जशी भूमिका आहे तशी मी प्रत्यक्ष आयुष्यात अजिबात नाही. या वेब सिरीज मध्ये प्रेक्षकांना दोन अभिनेत्रींचा अभिनय बघण्यास मिळणार आहे ज्यात ऍक्शन सुद्धा आहे आणि हास्याचा तडका सुद्धा. या आधी लारा २०१९ मध्ये ब्रिटिश ऐतिहासिक ड्रामा टिव्ही सिरीज बेचेम हाऊस मध्ये दिसली होती.

हे वाचा – एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !तसेच २०१८ मध्ये वेलकम टु न्यूयॉर्क, २०१६ मध्ये अजहर आणि फितूर तसेच २०१५ मध्ये सिंह इज ब्लिंग मध्ये दिसली होती. रिंकू राजगुरूचे सुद्धा हे हिंदी मधील पहिलेच काम आहे.

हे वाचा – बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *