२०२० मध्ये वाढून आता एवढा जास्त झाला सलमान खान यांचा बॉडीगार्ड शेराचा पगार !

bollyreport
2 Min Read

मित्रांनो सलमान खान यांचे बॉडीगार्ड म्हणजेच अंगरक्षक शेराला आज कोण ओळखत नाही. आज शेरा स्वतः एक मोठा सेलिब्रेटी बनला आहे. सोशल मीडियावर सुद्धा शेरा यांचे खूप चाहते आणि फॉलोवर आहेत. सलमान खान यांच्याकडे नोकरी करत असताना सुद्धा ते आज श्रीमंतासारखे जीवन जगत आहे पण मित्रानो आपणास माहिती आहे का शेरा किती कामवितात? जर तुमचे उत्तर नाही असेल तर आज आम्ही आपल्याला या बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
शीख परिवारात जन्मलेले शेरा यांना लहानपणा पासूनच बॉडी बिल्डिंग (शरीरयष्टी) ची आवड होती. याच कारणामुळे १९८७ ला ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि त्याच्या पुढच्या वर्षी मिस्टर महाराष्ट्र म्हणून त्यांची निवड झाली. शेरा यांचे वडील मुंबईत गाडी दुरुस्तीचे काम करायचे. १९९५मध्ये सोहेल खान ने सलमान यांच्या विदेशी दौऱ्यासाठी शेरा यांची सर्व्हिस मागितले. त्यानंतर सोहेल यांनी शेरा यांना विचारले भाई सोबत नेहमी राहणार का? एके दिवशी शेरा सलमान यांच्या ऑफिस वर त्यांना भेटायला गेले आणि झालेल्या चर्चेनुसार त्यांनी होकार दर्शवला. म्हणून आजतायगत शेरा सलमान यांचे बॉडीगार्ड च नाही तर कुटुंबातील एक सदस्य बनले आहेत.
बिज़नेस ऑफ सिनेमा च्या अहवालानुसार वर्ष २०२० मध्ये सलमान खान यांनी अंगरक्षक शेरा यांचा पगार वाढवला आहे. खरंतर आधी शेरा यांना सलमान प्रत्येक महिन्याला १५ लाख रुपयांची तगडी मोठी अशी फी देत असे आणि आता सलमान खान यांनी हि फी वाढवून १७ लाख रुपये केली आहे. या हिशोबाने वर्षांला शेरा २कोटींपेक्षा जास्त पगार सलमान खान यांच्याकडून घेतात.
शेरा यांची कमाई ह्या पगरपर्यंतच मर्यादित नाहीये. जसे कि, आपण जाणताच सलमान यांचे हृदय खूपच विशाल आहे, म्हणून सण उत्सव दरम्यान सलमान बहुतेकदा त्यांना भेट देत असतात. सोबतच सलमान खान यांचे अंगरक्षक असल्याने सलमान यांच्या महागड्या वस्तूंचा अनुभव घेण्याची संधी शेरा यांना मिळते. मित्रांनो , अंगरक्षक शेरा यांचा पगार आपणास कसा वाटला? काय भाईजान यांच्या दृष्टीने हा पगार कमी आहे कि जास्त आहे असं आपल्याला वाटते? या बद्दल कमेंट करायला विसरू नका.

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *