Headlines

संजय दत्तच्या बहिणींनी त्याला ऐश्वर्या राय पासून दूर राहण्याची दिली होती वॉर्निंग, जाणून घ्या का ?

ऐश्वर्या राय-बच्चन ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याची चर्चा भारता सोबतच इतर विदेशातही खूप होत असते. ऐश्वर्या एके काळी मिस वर्ल्ड सुद्धा बनवली होती. आता जरी ती चित्रपट सृष्टी पासून दूर राहणे पसंत करत असली तरीही एक काळ असा होता की मोठ मोठे अभिनेते तिच्यासोबत काम करण्यासाठी तरसायचे. या अभिनेत्यांपैकी एक होता तो म्हणजे संजय दत्त.
एका चित्रीकरणादरम्यान जेव्हा संजय दत्तने ऐश्वर्या रायला बघितले त्यावेळी तिच्या सौंदर्याला पाहून तो थक्क झाला. या गोष्टीचा खुलासा त्याने स्वतः एका मुलाखतीमध्ये दिला होता. मुलाखतीमध्ये संजय दत्तने सांगितले की त्याला ऐश्वर्या राय सोबत राहायचे होते मात्र त्याच्या बहिणींनी यासाठी त्याला साफ नकार दिला. सोबतच ऐश्वर्या राय पासून दूर राहण्याची वॉर्निंग सुद्धा संजय दत्तला त्याच्या बहिणींनी दिली. ही गोष्ट १९९३ ची आहे. जेव्हा संजय दत्तला ऐश्वर्या राय सोबत फोटो शूट करण्याची संधी मिळाली होती.
या फोटोशूट नंतर संजय दत्त ऐश्वर्या कडे मैत्रीचा हात पुढे करू इच्छित होता मात्र त्याच्या बहिणींनी या गोष्टीस नकार देऊन त्याला चेतावणी दिली की, त्याने ऐश्वर्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये शिवाय तिचा फोन नंबर सुद्धा घेऊ नये. कारण त्यावेळी संजय दत्तची इमेज खूप खराब झाली होती. संजय दत्तच्या त्या खराब इमेज बद्दल त्याच्या बहिणींना सुद्धा संपूर्ण माहिती होती. त्यामुळे संजय दत्त सोबतच्या मैत्रीमुळे ऐश्वर्याच्या करिअरवर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी संजय दत्तच्या बहिणीनी असे केले होते.
जेव्हा एका मुलाखतीमध्ये संजय दत्तला विचारले होते की, तुम्ही आधीपासून ऐश्वर्या रायला ओळखता का ? त्यावेळेस संजय दत्तने ओळखतो असे उत्तर दिले होते. हे उत्तर ऐकून ऐश्वर्या सुद्धा हैराण झाली होती. संजय दत्तने सांगितले की, तिला कोण ओळखत नाही? मी तिला पेप्सी च्या जाहिरातीमध्ये पाहिले होते. मीच काय तेव्हा तर सर्वांनी तिला पाहिले होते. खरेतर माझ्या बहिणींना ती खूप आवडायची. त्यांना ती खूप सुंदर वाटायची शिवाय त्या ऐश्वर्या ला आधी भेटल्या देखील होत्या.
२००५ मध्ये आलेल्या शब्द या चित्रपटात संजय आणि ऐश्वर्याने एकत्र काम केले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर संजय दत्तला तीन वर्षाची अटक झाली होती.
त्याच्या आयुष्यावर आधारित संजू हा चित्रपट आला होता. या चित्रपटात रणबीर कपूर ने संजय दत्तची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला जमण्यात यशस्वी ठरला. आता संजय दत्तचे मान्यता दत्त सोबत लग्न झाले असून त्याला दोन जुळी मुलं आहेत. तर ऐश्वर्या रायचे सुद्धा अभिषेक बच्चन सोबत लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *