Headlines

रामायण मालिकेतील या कलाकारांचे झाले निधन, लॉक डाऊन मुळे ही येत आहे अडचण !

ऐंशी-नव्वदच्या दशकात रामायण महाभारत या मालिका खूप प्रसिद्ध होत्या. या मालिका सुरू व्हायच्या अर्धा तास आधीच सर्व रस्ते सूनसान झालेले दिसायचे. इतके या मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केले. या चित्रपटातील सर्व कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. यातील काही कलाकार आज आपल्यात नाहीत. या मध्ये अजुन एक कलाकार सहभागी झाला आहे.
रामायण मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारणारे शाम सुंदर बऱ्याच काळापासून कॅन्सर शी झुंज देत होते. मात्र ही झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला. मात्र लॉक डाऊन मुळे त्यांच्या अस्ती गंगा नदीत विसर्जित करता येत नाहीत अशी खंत त्यांच्या परिवाराने सांगितली. त्यामुळे त्यांचा परिवार लॉकडाऊन संपण्याची वाट बघत आहे. श्याम यांच्या मृत्यू मुळे रामची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना खूप शॉक बसल्याचे त्यांनी व्यक्त केले.
श्याम सुन्दर गेली २० वर्षे कालका येथील हाउसिंग बोर्ड कॉलनी मध्ये राहत होते. ते रोज नित्य नियमाने रामचरितमानसचा पाठ करायचे. श्याम यांची पत्नी प्रिया कलानी या मुंबई नगर निगम मध्ये ऑफिसर या पदावर कार्यरत होत्या. आता त्या सेवानिवृत्त झाल्या असून पंचकुला येथील का शहरात राहतात. श्याम सुन्दर कलानी यांनी रामायण मालिके सोबत त्रिमूर्ती, छैला बाबू, आणि रांझा हिर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
असे म्हणतात की रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांना सुग्रिवाचा रोल करण्यासाठी योग्य असा कलाकार मिळत नव्हता. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. त्यावेळी त्यांनी भगवान रामाचे स्मरण केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीच श्याम सुन्दर त्यांना भेटायला गेले. त्यानंतर सुग्रिवाच्या रोल साठी श्याम यांना फायनल केले गेले.
रामायण मालिकेतील राम म्हणजेच अरुण गोविल यांनी श्याम यांच्या मृत्यू वर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणतात की , श्याम सुन्दर यांच्या निधनाची बातमी ऐकून फारच दुःख झाले. श्याम यांनी रामानंद सागर यांच्या रामायणात सुग्रिवाची भूमिका केली होती. ते एक सच्चा आणि सज्जन माणूस होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *