Headlines

शाहरुख खानच्या मुलीचा आणि सैफ अली खानच्या मुलाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल !

शाहरुख खान ला बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखले जाते. इतक्या वर्षे झाली तरी शाहरुख खानची जादू काही कमी झालेली नाही. एक काळ तर असा होता जेव्हा शाहरुख व्यतिरिक्त कोणताही अभिनेता बॉक्सऑफिसवर जास्त चालायचा नाही. शाहरुखची दोन्ही हात पसरून उभे राहायची सिग्नेचर स्टेप अजूनही लोकांना भुरळ घालून जाते. शाहरुखने त्याचे शिक्षण दिल्लीमध्ये पूर्ण केले त्यानंतर त्याने त्याची बालपणीची मैत्रीण गौरी सोबत लग्न केले. शाहरुखला गौरी पासून सुहाना आणि आर्यन अशी दोन मुले आहेत. त्यानंतर २०१३ मध्ये शाहरुख आणि गौरी सरोगसीद्वारे अबराम आई-वडील बनले. शाहरुखच्या मुलांविषयी बोलायचे झाले तर त्याची मुलगी सुहाना ही शाहरुख प्रमाणेच नेहमी चर्चेत असते. यामुळे ती काही वेळेस वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडली आहे.
तसे बघायला गेले तर सुहाना नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेचे कारण बनते. तिचे अनेक फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हल्लीच तिचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आम्ही ज्या फोटोबद्दल बोलत आहोत त्या फोटोत सुहाना बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान च्या मुलासोबत म्हणजेच इब्राहिम अली खान च्या गळ्यात हात घालून बसलेली दिसते. याव्यतिरिक्त या फोटोमध्ये तिने तिचे केस मोकळे सोडले असून लाल लिपस्टिक लावली आहे.
सोशल मीडियाद्वारे तिच्या लुकची तारीफ केली जात आहे. या फोटोमध्ये सुहाना आणि इब्राहिम दोघेही खूप खुश दिसत आहेत. त्यामुळे सुहाना आणि इब्राहिम यांची जोडी सध्या चर्चेत आली आहे.
सुहाना तिचे उच्चशिक्षण लंडन मधून करीत आहे. शिवाय तिला डान्स आणि खेळाची खूप आवड आहे. शाहरुखला त्याच्या मुलीने डान्सर बनावे असे वाटते परंतु सुहाना मात्र तिच्या वडिलांनी प्रमाणे अभिनयक्षेत्रात येऊ इच्छिते. यामुळेच ती तिच्या कॉलेज मार्फत आयोजित केलेल्या अनेक नाटकांमध्ये सहभागी होत असते.
२०१८ मध्ये सुहाना वोग या ग्लॅमर मॅगझिनच्या फ्रंट पेज वर दिसली होती. या कव्हर पेजसाठी तिने जे फोटोशूट केले होते त्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. या मॅगझीनच्या कव्हर पेजचे लॉन्चिंग खुद्द शाहरुख खानने केले होते. फेमिना या फिल्म मॅक्झिनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुखने सांगितले होते की जो मुलगा त्याच्या मुलीला डेट करू इच्छितो त्याच्यासमोर माझ्या काही अटी असतील. मला माझ्या मुलीच्या आयुष्यात एखादा चांगला मुलगा आलेला नक्कीच आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *