Headlines

प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी सनी लिओन ने सुरू केला हा नवीन ऑनलाईन शो !

कोरोना व्हायरस लोकांना जितकी शारीरिक हानी पोहोचवत आहे त्याहून कित्येक पटीने जास्त मानसिक हानी पोचवत आहे. त्यामुळे जे लोक कोरोना बाधित नाहीत असे लोक सुद्धा या व्हायरसच्या दहशतीखाली जगत आहेत. कोरोनाच्या सावटामुळे पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला. ह्या लॉक डाऊन मुळे लोक घरात राहून कंटाळली आहेत सोबतच त्यांच्यामध्ये नकारात्मक विचार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

अशा लोकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि नीरस झालेल्या दिनचर्येला उत्साहाने भरण्यासाठी अभिनेत्री सनी लियोनी ने एक चॅट शो सुरू केला आहे. तिच्या या चॅट शोचे नाव आहे लॉक्ड अप विथ सनी. या चॅट शो मध्ये सनी भारतातील काही नामांकित व्यक्तींसोबत मुड हलका करणाऱ्या गप्पा मारणार आहे.

हा शो मागील आठवड्यातील गुरुवार पासून प्रदर्शित होऊ लागला. या शो च्या पहिल्या भागातच पाहुणे म्हणून फोटोग्राफर डब्बु रत्नांनी आणि युट्यूब सेंसेशन अनिषा दीक्षित येऊन गेले. याव्यतिरिक्त अभिनेता अरबाज खानची प्रियसी जॉर्जिया एंड्रियानी ही सुद्धा सनी सोबत ऑनलाईन कनेक्ट होती.

रविवारी सनीच्या शो मध्ये टिव्ही रियालिटी शो बिग बॉस मार्फत प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मंदना करीमी हिने प्रेक्षकांशी संवाद साधला. स्वतः च्या शो बद्दल बोलताना सनीने सांगितले की हा विचार माझ्या डोक्यात केवळ मजा करण्यासाठी आला होता. मी फक्त इंस्टाग्राम द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करू इच्छित होती. हा शो फक्त हलक्या फुलक्या गप्पांवर आधारित आहे. या शो मधून मी माझ्या काही पाहुण्याची माहिती लोकांना देते.

हा चॅट शो सनीच्या सोशल मीडियामधील इंस्टाग्राम अकाऊंट वर दुपारी दीड वाजता प्रदर्शित केला जातो. सनीच्या शो मध्ये आलेली पहिली पाहुणी कलाकार अनिषा दीक्षित ही तिची खूप चांगली मैत्रीण होती. तर डब्बू रत्नांनी हे दरवर्षी त्यांच्या कॅलेंडर मध्ये सनीचे फोटो सहभागी करत असतात.

यावर्षी सुद्धा त्यांनी कॅलेंडरमध्ये सनीचे फोटो छापले होते जे नुकतेच सनी ने तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंट वर शेअर केले होते. कोरोना व्हायरस मुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे सनी सुद्धा तिच्या परिवारासोबत घरातच वेळ घालवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *