Headlines

तमन्ना भाटिया या अभिनेत्यासाठी तोडणार ‘ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसी’ !

तमन्ना भाटिया ही हिंदी तसेच टॉलीवुड मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी तसेच टॉलीवुडमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने पंधराव्या वर्षी प्रथम हिंदीमधील ये चांद सा रोशन चेहरा या चित्रपटात काम केले. तेलुगू, तामिळ चित्रपटांमध्ये ही ती काम करते. पण चित्रपटामध्ये ती किस्सिंग सीन करत नाही.
अनेक वर्षांपासून ती चित्रपटांमध्ये काम करते आहे, पण ‘ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसी’ तिने तोडली नाही. हल्लीच एका मुलाखतीमध्ये तिने स्पष्ट केले की एका अभिनेत्यासाठी ती हा नियम तोडायला तयार आहे. आजकाल ती तिने स्वयंवर या मुद्द्यावर दिलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ती वक्तव्यामध्ये घोषणा करत म्हणाली जर तिचे स्वयंवर झाले तर तिच्या स्वयंवरामध्ये ती कोणत्या ३ अभिनेत्यांना बोलवण्याची तिची ईच्छा आहे.
तिला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला गेला की जर का तमन्नाचे कधी स्वयंवर झाले तर कोणत्या ३ अभिनेत्यांना स्वयंवरमध्ये सामील झालेले पाहायचे आहे? या प्रश्नाचे उत्तर देत तमन्ना म्हणाली, ती तिच्या स्वयंवरमध्ये ऋतिक रोशन, विक्की कौशल आणि प्रभास यांना पाहू इच्छित आहे. पुढे ती हे देखील म्हणाली, ऑनस्क्रीन नो किसिंग पॉलिसीचे ती नेहमी पालन करत आली आहे आणि तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुद्धा या गोष्टीचा समावेश आहे. परंतु रितिक रोशन सोबत कोणता चित्रपट करायची संधी तिला मिळाली तर ती हा नियम तोडू देखील शकते.
तमन्ना भाटिया रितिक रोशन ची खूप मोठी चाहती आहे. ती रितिक रोशन सोबतच्या भेटीबद्दल देखील खूप बोलली. ती म्हणाली की, ‘थोड्या दिवसांपूर्वी तमन्ना रितिक रोशनला भेटली होती. खरंतर मी त्यांच्यावर आपटली होती. मी म्हटलं की मी तुमची खूप मोठी चाहती आहे. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. त्यावर रितिक रोशन ओके म्हणाले आणि पुढे चालू लागले. पुढे जाता जाता त्यांनी मागे वळून पाहिलं आणि विचारलं तुम्हाला माझ्यासोबत फोटो काढायचा आहे का? मी म्हटलं हो.’ तमन्ना आणि रितिक रोशनचा हा फोटो सोशल मीडियावर फार फिरत होता.
‘बोले चूड़ियां’ या हिंदी आगामी चित्रपटात तमन्ना आपल्याला काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तमन्ना सोबत नवाजुद्दीन सिद्दीकी हे मुख्य पात्राच्या भूमिकेत दिसतील. सोबतच तमन्नाचा तेलगू चित्रपट ‘सिटीमार’ देखील या वर्षात रिलीज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *