Headlines

हिंदी चित्रपट सृष्टीतील हे कलाकार आहेत राजे – महाराजांच्या परिवारातील !

हिंदी चित्रपट सृष्टी तसेच हिंदी वाहिन्यांमधील कलाकार देखील राजे-महाराजांच्या परिवाराचे वंशज आहेत. आपल्या देशामध्ये अनेक मोठं मोठी घराणी होऊन गेली. त्यांचे वंशज अजूनही त्यांच्या रूढी-परंपरा त्यांच्या घराण्यांनुसार चालवत आहेत. अशाच काही मोठ्या व पारंपरिक घराण्यातील पाच कलाकारांची माहिती आपण घेऊयात जे हिंदी मनोरंजन क्षेत्रात तसेच राजकारणात कार्यरत आहेत.

भाग्यश्री – ‘मैने प्यार किया’ या सुपरहिट चित्रपटातून लोकांच्या पसंतीस पडलेली अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री. भाग्यश्री हिंदी तामीळ तेलुगु कन्नडा भोजपुरी इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भाग्यश्री महाराष्ट्रातील सांगली येथील राजघराण्यातील आहेत. भाग्यश्री यांचे वडील विजयसिंहराव माधवराव पटवर्धन हे सांगलीचे राजा होते. त्यांना भाग्यश्री यांनी चित्रपटात काम करणे फारसे पसंद नव्हते. त्यामुळे भाग्यश्री यांनी वय कमी असतानाच लग्न करून चित्रपटात काम करणे बंद केले.
मोहिना कुमारी – मोहिना कुमारी ह्या एक उत्तम नृत्यांगना आहेत. स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमध्ये तिने काम करून प्रेक्षकांकडून अधिक पसंती मिळवली आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या सुप्रसिद्ध नृत्याच्या रिऍलिटी शोमध्ये देखील त्या होती. त्याचबरोबर व्ही वाहिनीवरील डी3 म्हणजेच ‘दिल दोस्ती डान्स’ या मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे मोहिना या एक कोरिओग्राफर देखील आहेत. मोहिना या मध्यप्रदेश येथील रीवा घराण्याची राजकुमारी आहे. महाराजा पुष्पराज सिंह जूदेव यांची त्या कन्या आहेत. सोबतच उत्तराखंड राज्याचे कैबिनेट मंत्री आणि आध्यात्मिक गुरु सतपाल महाराज यांची सून आहे. मोहिना यांचे लग्न सतपाल महाराज यांचा छोटा मुलगा सुयश रावत यांच्याशी झाले आहे.
सोनल चौहान – जन्नत या हिंदी चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे सोनल चौहान. या एक मॉडेल सुद्धा आहेत. सध्या त्या चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी सोशल मीडियावर त्या अधिक प्रसिद्ध आहेत. सोनल चौहान या उत्तरप्रदेश राज्यातील राजपूत राजघराण्यातील आहेत.
अदिती राव हैदरी – हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अदिति राव हैदरी ह्या सालेह अकबर हैदरी आणि तेलंगणामधील वनापर्थीचे राजे जे.रामेश्वर या दोन राजघराण्यांतील असल्याचे ओळखल्या जातात. अदिती यांची आई अदिती राव या हिंदू आहेत. तर त्यांचे वडील एहसान हैदरी हे बोहरी मुस्लिम होते.
ज्योतिरादित्य सिंधिया – ज्योतिरादित्य सिंधिया हे एक राजकारणी आहेत. हल्लीच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून ते भाजपामध्ये सामील झाल्याने त्यांचे नाव चर्चेत आहे. सिंधिया परिवार हा मध्यप्रदेश मधील ग्वालियर घराण्यामध्ये येते. ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आजोबा या राजघरण्याच्या गादीवर बसणारे शेवटचे राजा होते. ज्योतिरादित्य सिंधिया हे राजकारणातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीमध्ये गणले जातात. ज्यांची एकूण संपत्ती पंचवीस करोड इतकी आहे आणि ही संपत्ती त्यांना वारसा हक्काने मिळाली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे ग्वालियर मधील त्यांच्या शाही घराण्याच्या जय विलास पॅलेस मध्ये ते राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *