Headlines

हे आहेत साऊथ चित्रपट श्रुष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेते, एकानेतर अमिताभ बच्चन यांना पण पाठीमागे टाकले आहे !

भारतासह संपुर्ण जगात बॉलिवुड अभिनेत्यांची ख्याती आहे. हे कलाकार त्यांच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट तसेच जाहिरातीत झळकत असतात. त्यामार्फत त्यांना बक्कळ पैसा कमावता येतो. काही कलाकार तर अभियनासोबत स्वताचा बिझनेससुद्धा चालवतात. त्यामुळे आजच्या काळात अशा कलाकारांकडे स्वताचे असे मोठे घर, हॉटेल आणि रेस्ट्रॉरंट आहे. पण आज आम्ही तुम्हाला या लेखातुन बॉलिवुड नव्हे तर साऊथकडिल अभिनेत्यांबद्ल सांगणार आहोत. ज्यांचे नाव सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सहभागी आहे.

नागार्जुन – अभिनेता नागार्जुन हा साऊथकडिल नामांकित अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने साऊथ सोबतच बॉलिवुड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याने त्याच्या ३५ वर्षांच्या करियरमध्ये हिंदी, तमिळ, तेलगु आणि कन्नड भाषांमध्ये काम केले. यामध्ये त्याने १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागार्जुन संपत्तीच्या बाबतीत महानायक अमिताभ बच्चन यांना देखील मागे सोडतात. कारण नागार्जुन यांची संपत्ती ३००० करोड रुपये आहे तर अमिताभ यांची संपत्ती २८०० करोड रुपये आहे.

चिरंजीवी – या यादीत पुढील नाव येते अभिनेता चिरंजीवचे. चिरंजीवीने सुद्धा साऊथव्यतिरिक्त बॉलिवुडमध्ये पण काम केले आहे. साऊथकडील लोकांच्या मनात चिरंजीवी बद्दल भरपूर प्रेम आणि आपुलकी आहे. चिरंजीवीने त्याच्या १५० चित्रपटामध्ये काम करण्यासाठी २७ करोड रुपये चार्ज केले होते. तर त्याच्याकडे सध्या १५०० करोड रुपये संपत्ती आहे. शिवाय त्याच्याकडे १५ करोड रुपयांचा सुंदर बंगला देखील आहे.

रजनिकांत – रजनिकांतला साऊथकडील लोक देव मानतात हे आपण सर्वच जण जाणतो. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकुण ४०० करोड रुपयांची संपत्ती आहे. रजनिकांत दरवर्षी लाखो करोडो रुपये दान सुद्धा करतात.

जूनियर एनटीआर – साऊथ कडील चित्रपटांमध्ये एन. टी.आर. हे ज्युनियर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे खरे पूर्ण नाव नंदमुरारी तारका रामाराव आहे. साऊथ सिनेसृष्टीतील ते मोठे कलाकार मानला जातात. त्यांचे वडील आणि आजोबा देखील सिनेसृष्टीशी निगडीत होते. ज्युनियर एनटीआर हे दक्षिणेतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. सध्या ते २७०० कोटींच्या एकूण संपत्तीचे मालक आहेत.

राम चरण – वडील चिरंजीवी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राम चरण यांनीही दक्षिणेतील चित्रपटांमध्ये स्वताचा ठसा उमठवला. आजच्या काळात तो एक मोठा सुपरस्टार तर आहेच पण साऊथ सिनेमाचा यूथ आयकॉन सुद्धा आहे. मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा आणि सुपरस्टार पवन कल्याणचा पुतण्या राम चरणची एकूण संपत्ती 2800 कोटी रुपये आहे.

अल्लू अर्जुन – साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण करणारा अल्लू अर्जुनही या यादीत मागे नाही. साऊथसोबतच तो संपूर्ण भारतात अॅक्शन स्टार अल्लू अर्जुन या नावाने ओळखला जातो. त्याच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर, मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन एकूण ३५० कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.

प्रभास – बाहुबली चित्रपटातून घराघरात प्रसिद्ध झालेला प्रभास राजू हा साऊथ चित्रपटसृष्टीचा मोठा चेहरा मानला जातो. त्यांनी साऊथ चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक उत्तम अॅक्शन चित्रपट दिले आहेत. यासोबतच प्रभासने २०१९मध्ये ‘साहो’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. प्रभासची एकूण संपत्ती २०० कोटींहून अधिक आहे.

महेश बाबू – महेश बाबू हा साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वात देखणा अभिनेता मानला जातो. तो नेहमीच त्याच्या अॅक्शन आणि हॅण्डसम लूकमुळे चर्चेत असतो. महेश बाबू एका चित्रपटासाठी २२ते २५ कोटी रुपये घेतात. महेश बाबू यांची एकूण 350 कोटींची संपत्ती आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !