बॉलिवूडमध्ये एकाहून एक सरस कलाकार आहेत. यातील काही कलाकार हे खानदानी कलाकार आहेत म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंब अभिनय सृष्टीशी जोडले गेलेले आहे. या कलाकारांना स्टार किड्स म्हणून ओळखले जाते. तर काही कलाकार असेही आहेत ज्यांनी खूप संघर्ष करून बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. स्टार किड्स बद्दल बोलायचे झाल्यास काहींचे आई-वडील हे त्यांच्या काळातील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जायचे. मात्र त्यांची मुलं त्यांच्या आई वडिलांसारखे नाव कमावू शकले नाहीत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या आई या काळातील सुपरहिट अभिनेत्री होत्या मात्र मुलींना त्यांच्याइतकी प्रसिद्धी मिळवता आली नाही.
सोहा अली खान –
सोहा अली खान ही अभिनेता सैफ अली खानची बहीण आणि पूर्वीच्या काळातील दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी आहे. दिल मांगे मोअर या चित्रपटातून सोहाने तिच्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. यानंतर तिने काही चित्रपट केले परंतु तिच्या आई इतके नाव ती कमावू शकली नाही.
ईशा देओल –
ईशा देओल ही बॉलीवूडच्या ड्रीम गर्ल ची म्हणजेच हेमा मालिनी ची मुलगी आहे. हेमा मालिनी एकेकाळची टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे पण हेमा मालिनीची मुलगी ईशा देओल ही तिच्या इतकी सफल होऊ शकली नाही. ईशाने २००२ मध्ये कोई मेरे दील से पूछे या चित्रपटामधून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचा सुद्धा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर ईशा देओल ने अनेक चित्रपट केले पण तिच्या आई इतकी कमालता तिला दाखवता आली नाही.
तनिषा मुखर्जी –
तनिषा मुखर्जी ही अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आणि अभिनेत्री काजोलची बहीण आहे. तनिषा मुखर्जी ची फिल्मी सफर खूपच छोटी होती. ती तिच्या आई आणि बहिणी प्रमाणे नाव कमावू शकली नाही. तनिषाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात २००३ मध्ये आलेल्या स्स्स्स्सशश…. या चित्रपटामधून केली होती.
रिया सेन –
रिया सेन ही प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन ची मुलगी आहे. रिया सेन ने बॉलीवूड मध्ये तिच्या आईप्रमाणे स्वतःचे नाव कमावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती त्यात फारशी यशस्वी झाली नाही. रिया सेन ने स्टाईल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता.
प्रतिभा सिन्हा –
प्रतिभा सिन्हा ही बॉलीवूड ची सुपरहिट अभिनेत्री माला सिन्हा ची मुलगी आहे. प्रतिभा सिन्हाला चित्रपटांपासून दूर होऊन खूप वेळ उलटुन गेला. प्रतिभाने मुख्य अभिनेत्री म्हणून १९९२ मध्ये आलेल्या मेहबूब मेरे मेहबूब या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र ती तिच्या आईप्रमाणे एक दिग्गज अभिनेत्री बनू शकली नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !