Headlines

या अभिनेत्रींना त्यांच्या नवऱ्याने साखरपुडयाला घातलेल्या अंगट्यांची किंमत पाहून अवाक व्हाल !

२०१८-२०१९ मध्ये अनेक बॉलिवुड सेलिब्रिटींची लग्न झाली. त्या वर्षी लग्न झालेल्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियांका चोपडा यांसारख्या अभिनेत्रींचे नाव सहभागी आहे. या अभिनेत्रींचे लग्न मोठ्या धामधुमीत झाले होते. या लग्नांमध्ये अमिताभ बच्चन, रेखा, सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दीक्षित यांसारख्या मोठमोठ्या कलाकारां सोबत अनेक बॉलिवूडकर सहभागी होते. या सर्वांनी त्यांच्या लग्नात करोडो रुपये खर्च केले होते. या अभिनेत्रींच्या लग्नात आकर्षणाची गोष्ट होती ती म्हणजे त्यांच्या साखरपुड्याची अंगठी. जी त्यांच्या होणाऱ्या नवऱ्याने त्यांना साखरपुड्यात घातली होती. आज आम्ही या पोस्ट द्वारे तुम्हाला अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांना त्यांच्या साखरपुड्यात महागड्या अंगठ्या मिळाल्या होत्या.
सोनम कपूर –
बॉलिवुडची फॅशन क्वीन सोनम कपूरने २०१८ मध्ये तिचा प्रियकर आनंद आहुजा सोबत लग्न केले होते. हे लग्न सर्वांनाच आठवत असेल. सोनम च्या लग्नात संपूर्ण बॉलीवूड हजर होते. सोनम आणि आनंद च्या साखरपुड्याबद्दल जास्त चर्चा झाली नव्हती. मेहंदी, संगीत, लग्न,आणि रिसेप्शन यामध्ये साखरपुडा कधी झाला हे कोणालाच कळले नाही. मिळालेल्या बातमीनुसार सोनमच्या साखरपुड्यातील अंगठीची किंमत ९० लाख रुपये इतकी आहे असे सांगितले जाते. आता ही अंगठी बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या महागड्या अंगठ्यांचा यादीत सहभागी झाली आहे.
प्रियंका चोपडा –
बॉलीवूड ची देसी गर्ल प्रियंका चोपडा ने तिचा अमेरिकेतील प्रियकर सिंगर निक जोनास सोबत एक आणि दोन डिसेंबर २०१८ ला लग्न केले. हे लग्न बॉलीवूड मधील शाही लग्नामधील एक मानले जाते. लग्नाआधी काही महिन्यांपूर्वीच निक जोनास ने प्रियांका सोबत साखरपुडा केला होता. या साखरपुड्यात निक ने प्रियांकाला २.१ करोड रुपयांची अंगठी घातली. प्रियांका नेहमीच तिच्या साखरपुड्याची अंगठी घालताना दिसते.
दीपिका पादुकोण –
बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण ने १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ ला इटली मध्ये अभिनेता रणवीर सिंह सोबत लग्न केले. या लग्नाची चर्चा भारता सोबतच विदेशात सुद्धा झाली होती. लग्नासोबतच दीपिका आणि रणवीरने इटली मध्येच साखरपुडा उरकून घेतला होता. दीपिकाची साखरपुड्याची अंगठी सर्वांपेक्षा थोडी वेगळी आहे कारण अंगठी चा आकार हा गोलाकार असतो मात्र तिच्या अंगठीचा आकार चौकोनी होता. ही सिंगल सोलिटेअर स्क्वेअर डायमंड रिंग खूप किमती आहे. या अंगठीची किंमत साधारण १.३ ते २.७ करोड रुपये इतकी आहे.

शिल्पा शेट्टी –
शिल्पा शेट्टीने बिझनेस मॅन राज कुंद्रा सोबत नोव्हेंबर २००९ मध्ये लग्न केले होते. या लग्नाच्या चर्चा आज देखील प्रसिद्ध आहेत. राज कुंद्रा हा त्याच्या प्रिय पत्नीस नेहमीच वेगवेगळे महागडी भेट वस्तू देत असतो. मात्र तिच्या साखरपुड्याच्या अंगठीची गोष्ट वेगळी आहे. राजने त्याच्या सुंदर पत्नीसाठी एक खास अंगठी बनवून घेतली होती. शिल्पाच्या अंगठी मध्ये २० कॅरेट चे सॉलिटेअर आहे. या सुंदर अंगठीची किंमत तीन करोड रुपये इतकी आहे.
अनुष्का शर्मा –
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली सोबत १४ नोव्हेंबर २०१७ सोबत लग्न केले. या दोघांनी त्यांचे लग्न गुप्त पद्धतीने इटली मध्ये जाऊन केले होते. या दोघांच्या लग्नाची खबर कोणालाच नव्हती. लग्नाआधी एक दिवस आधी या दोघांनी इटलीमध्ये साखरपुडा उरकून घेतला. विराटने त्याच्या पत्नीस १ करोड रुपयांची अंगठी घातली होती. ही अंगठी बनवायला विराटला ३ महिन्यांचा कालावधी लागला होता. अनुष्काच्या साखरपुड्याची अंगठी ऑस्टरेलिया च्या डिझायनर ने डिझाईन केली होती.
असीन – बॉलीवूड आणि साऊथ कडील अभिनेत्री असीन ने जानेवारी २०१६ मध्ये मायक्रोमॅक्स चे को फाउंडर राहुल शर्मा सोबत लग्न केले होते. तिच्या साखरपुड्याच्या अंगठीची किंमत तब्बल सहा करोड रुपये इतकी होती. या अंगठीत २० कॅरेट च्या सॉलिटेअर होते. ही अंगठी खास बेल्जियम वरून मागवण्यात आली होती. याशिवाय त्या अंगठीत असीन आणि राहुलच्या नावाची सुरुवातीची अक्षरे ए आणि आर सुद्धा आहेत. शिवाय या अंगठीत राहुल कडून असीन साठी एक खास संदेश सुद्धा लिहिला आहे.
जेनेलिया डिसूझा – अभिनेत्री जेनेलिया डिसूझा ने २०१२ मध्ये बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुख सोबत लग्न केले होते. रितेश ने जेनेलियाला साखरपुड्यात १४ कॅरेट ची सॉलीटेअर वाली अंगठी घातली होती. या अंगठीची किंमत ५० लाख रुपये इतकी आहे.
करीना कपूर – बॉलिवुडची बेबो म्हणजेच करीना कपूरने २०१० मध्ये बॉलिवुडचा नवाब म्हणजेच सैफ अली खान सोबत लग्न केले. हे लग्न अगदी साध्या पद्धतीत केले होते. सैफ आणि करीनाने कोर्ट मध्ये जाऊन लग्न केले.सैफने करीनाला ५ कॅरेट प्लॅटिनम ची डायमंड अंगठी घातली होती. या अंगठी ची किंमत ७५ लाख रुपये आहे. करीना कपूरने खूपदा ही अंगठी घातलेली दिसते.
ऐश्वर्या राय – बॉलिवुडची सदाबहार सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन ने २००७ मध्ये अभिषेक बच्चन सोबत लग्न केले होते. हे शाही लग्न अजूनही कोणी विसरलेले नाही. या लग्नात ऐश्वर्याने खूप भरजरी साडी घातली होती. अभिषेक ने ऐश्वर्याला ५३ कॅरेट ची अंगठी घातली होती. या अंगठी ची किंमत ५० लाख रुपये इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *