महेश बाबू बनले साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक फि घेणारा अभिनेता, एका चित्रपटासाठी एवढे करोड रुपये घेतात !

bollyreport
3 Min Read

साउथ इंडस्ट्री मधील सुपरस्टार महेश बाबू यांचे संपूर्ण कुटुंब जरी फिल्म इंडस्ट्री मधीलच असले तरीही महेश बाबूंनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये मोठे नाव कमावले आहे. आजच्या काळात टॉलिवूडमधील सर्वाधिक पैसे घेणारा अभिनेता म्हणून महेश बाबूचे नाव घेतले जाते. इंटरनेटवर असलेल्या माहिती नुसार महेश बाबू एक चित्रपट करण्यासाठी तब्बल २५ करोड रुपये फी घेतात.
महेश बाबु यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या लहानपणी आठ चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यानंतर मुख्य अभिनेता म्हणून १९९९ मध्ये आलेल्या चित्रपटात दिसले होते. महेश बाबू यांनी एकेकाळची मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर सोबत लग्न केले. कमाईच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महेश बाबू साऊथ सोबतच बॉलिवुडच्या टॉप अभिनेत्यांना टक्कर देत असतात. सध्याच्या काळात महेश बाबू यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक फी घेणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. सोबतच असते अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये सुद्धा काम करतात त्यामुळे त्या ब्रँडचा चेहरा म्हणून महेश बाबूंना ओळखले जाते.
महेश बाबू यांचे नुकतेच येऊन गेलेले तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड हिट ठरले. महेश बाबू यांची फॅन फॉलोविंग सुद्धा जबरदस्त आहे. त्यांच्या महर्षी या चित्रपटातील अभिनयामुळे प्रेक्षकांना थेटर कडे येण्यास मजबूर केले होते. यामुळे हा चित्रपट खुप हिट झाला होता. महेश बाबूंच्या अभिनयाचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे भारत एएन नेनु. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा त्यांच्याकडे आकर्षित झाले होते.
महेश बाबू यांनी एका पाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन टॉप लिस्टमध्ये स्वतःचे नाव टिकवून ठेवले आहे. त्यांचा प्रत्येक रोल प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ठरतो. त्यामुळे असे बोलणे वावगे ठरणार नाही की पडद्यावरील प्रत्येक रोल ने महेश बाबूंना प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास भाग पाडले आहे. याच कारणामुळे ते सध्या साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील सर्वाधिक फी घेणारा अभिनेता बनले आहेत. तर दुसरीकडे महेश बाबू साउथ इंडिया मधील एंडोर्समेंट चा किंग सुद्धा आहे. या बाबतीत त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. महेश बाबू साऊथ इंडिया मधील सुपरस्टार आहेतच पण सोबतच ते नोर्थ इंडिया मध्ये सुद्धा खूप लोकप्रिय आहेत.
नुकताच महेश बाबू यांचा सरीलरू नीकेवरू हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. हा चित्रपट शंभर करोड आकडा पार करणारा महेश बाबू यांचा तिसरा चित्रपट ठरला. या चित्रपटात महेश बाबू यांनी एका सेना अधिकाऱ्याची नवी भूमिका साकारली होती.‌

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *