बॉलीवूड इंडस्ट्रीज मध्ये असे काही कलाकार आहेत ते त्यांच्या एका विशिष्ट शैली साठी ओळखले जातात. या अभिनेत्यांपैकी एक आहे गोविंदा. अभिनेता गोविंदा चे नाव अनेकदा विनोदी चित्रपटांसाठी घेतले जाते. गोविंदाचा परफेक्ट कॉमेडी टाइमिंग साठी प्रसिद्ध आहे. सध्या या तो अधिक चित्रपटांमध्ये दिसत नाही. मात्र अजूनही त्याचे फॅन्स त्याला कॉमेडीचा बादशहा म्हणूनच ओळखतात.
गोविंदा बॉलीवूड मध्ये तन – बदन या चित्रपटांमधून पदार्पण केले होते. गोविंदाने स्ट्रीट डान्सर पासून ते एक उत्कृष्ट डान्सिंग स्टार अशी स्वतः ची ओळख तयार केली. सुरुवातीच्या काळात गोविंदाने लव ८६, खुदगर्ज, हत्या, दरिया दिल, जीते हे शान से, हम, जंग बाज, ताकतवर आणि गैर कानुनी यांसारखे काही रोमँटिक आणि ऍक्शन चित्रपटात काम केले. १९९० मध्ये गोविंदाचे आवरा, शोला ओर शबनम, आंखे, स्वराग, राजा बाबू, कुली नं १, बनारसी बाबू, दिवाना मस्ताना, हिरो नं १, बडे मियां छोटे मिया आणि हसीना जायेंगी यांसारखे चित्रपट आले. त्यानंतर काही काळासाठी गोविंदा चित्रपट सृष्टीतून गायब झाला होता मात्र काही काळानातर सलाम ए इश्क, पार्टनर आणि रावण यांसारख्या चित्रपटामधून कम बॅक केले.
गोविंदाची एकूण संपत्ती १५ मिलियन डॉलर म्हणजेच ११३ करोड रुपये इतकी आहे. त्याचा नेटवर्थ स्त्रोत खूप कमी आहे. गोविंदा त्याची प्रमुख कमाई अभिनय करून कमावतो. प्रत्येक हिंदी चित्रपटांत काम करण्यासाठी गोविंदा ३ ते ४ करोड रूपये फी घेतो. हिंदी चित्रपटां व्यतिरिक्त गोविंदाने समाधी या बंगाली चित्रपटात सुद्धा काम केले आहे. या चित्रपटामुळे सुद्धा गोविंदाने खूप पैसे कमवले होते. याशिवाय टेलिव्हिजन विश्वात जितो छप्पर फाड के, डान्स इंडिया डान्स सुपर मॉम यांसारख्या शो मध्ये सुद्धा काम केले आहे.
गोविंदाचे मुंबई सारख्या ठिकाणी ३ पॉश बंगले आहेत तर रायगडला एक फार्महाऊस आहे. तसेच गोविंदाकडे अनेक महागड्या कार चे कलेक्शन आहे. या मध्ये मित्सुबिशी लांसर आणि फोर्ड एंडेवर यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.
Bollywood Updates On Just One Click