१९८९ मध्ये आलेल्या सलमान खानचा चित्रपट ‘मैने प्यार किया’ मधून पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री संबंधित एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भाग्यश्री आणि हिमालय लहानपणी एकाच शाळेत शिकायचे. त्यानंतर कॉलेज मध्ये आल्यावर हिमालय ने भाग्यश्रीला लग्नासाठी मागणी घातली. मात्र या लग्नासाठी भाग्यश्रीचा परिवार राजी नव्हता. त्यानंतर १९९० मध्ये भाग्यश्री ने तिच्या परिवारा विरूद्ध जाऊन हिमालय शी लग्न केले.
भाग्यश्री ने सांगितले की हिमालय हे तिचे पहिले प्रेम होते. मी त्यांच्याशीच लग्न केले परंतु एक असाही काळ होता जेव्हा हे दोघे एकमेकांपासून दूर झाले होते. मात्र नंतर सगळं सुरळीत झाल्यावर आम्ही पुन्हा एकत्र आलो. भाग्यश्रीने तिच्या परिवाराच्या विरुद्ध जाऊन हिमालय दासानी सोबत लग्न केले होते. लग्नानंतर तिने खूप कमी आणि मोजक्याच चित्रपटात काम करणे पसंत केले.
हे वाचा – बॉलिवुड मध्ये अभिनेत्री बनण्यासाठी काय परिस्थिती मधून जावे लागले ऐका अभिनेत्रींच्याच तोंडून !
ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली. लग्नानंतर भाग्यश्री ने एक मुलगा व एका मुलीला जन्म दिला. भाग्यश्री चा मुलगा आता २७ वर्षांचा झाला असून तो सलमान खान पेक्षा ही हँडसम दिसतो. तर भाग्यश्री आता ५१ वर्षांची झाली आहे. पण तरी सुद्धा तिच्या सौंदर्यात जरा देखील कमी झालेली नाही. ती अजून सुद्धा एका २२ वर्षांच्या तरुणी सारखीच सुंदर दिसते.
हे वाचा – या कारणामुळे काजोलला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटात घालावा लागला होता मिनीस्कर्ट !
भाग्यश्रीचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ ला झाला. ती मिरजच्या शाही पटवर्धन परिवारातून आहे. भाग्यश्री चे पूर्ण नावं श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री पटवर्धन असे आहे. दूरदर्शन वरील कच्ची धूप या मालिकेतून भाग्यश्री ने तिच्या अभिनयातील करीयरला सुरूवात केली होती. लग्नानंतर भाग्यश्री तिच्या पती सोबत २/३ चित्रपटात दिसली होती. चित्रपटात काम करण्यासाठी भाग्यश्री ची अट असायची की त्या चित्रपटात हीरो ची भूमिका तिच्या नवऱ्याला द्यावी.
हे वाचा – टिव्हीवर खळखळून हसायला लावणारे हे कलाकार एका शोसाठी घेतात एवढी फी !
मात्र काही दिग्दर्शकांना तिची ही अट मान्य व्हायची नाही. त्यामुळे ते त्या चित्रपटासाठी भाग्यश्री चा विचार करणे सोडून द्यायचे. त्यानंतर हळूहळू भाग्यश्री चित्रपटातून गायब झाली. सर्वात शेवटी ती २००१ मध्ये आलेल्या हॅलो गर्ल्स या चित्रपटात दिसली होती.
हे वाचा – अजय सोबत नसतं जुळलं तर शाहरुख खान सोबत लग्न केले असते का ? या प्रश्नावर काजोलने दिले हे उत्तर !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !