बॉलिवु़डची नामांकित आणि सुंदर अभिनेत्री सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. वेगवेगळ्या मुद्यांवर आपले मत मांडण्यासाठी सुद्धा तिला ओळखले जाते. सोशल मिडियावर नेहमी स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या दियाने काही दिवसांपुर्वी असे काही पोस्ट केले ज्यामुळे ती चर्चेत आली.
काही दिवसांपुर्वीच दियाने प्रदुषण आणि पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टसंबधी एका बातमीवर प्रतिक्रिया दिली. तिची ती प्रतिक्रिया सोशल मीडियावर सध्या खुप व्हायरल होत आहे. तिचे चाहातेसुद्धा यावर मजेशीर प्रतिक्रीया देत आहे. मध्यंतरी प्रदुषणाचा पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर वाईट परिणाम होतो असा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टवर प्रतिक्रिया देण्यावाचुन दिया स्वताला रोखु शकली नाही.
Human penises are shrinking because of pollution, warns scientist https://t.co/EnWN7uH9gG
— Sky News (@SkyNews) March 24, 2021
त्या रिपोर्टवर दियाने एक ट्विट केले जे वेगात व्हायरल होत आहे. दियाने ट्विटमध्ये लिहीले आहे कि, या माहितीमुळे तरी लोक पर्यावरण संरक्षण आणि वायु प्रदुषण या विषयावर जागरुक होतील. हे ट्विट वाचुन लोक आता दियाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
दिया आता ३९ वर्षांची असुन तिने गेल्या महिन्यात तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखी सोबत दुसरे लग्न केले. वैभव रेखी हे पेशाने बिझनेसमन आहेत. वैभवचे सुद्धा हे दुसरे लग्न आहे. असे म्हटले जाते कि लॉक डाऊनच्या काळात या दोघांमधील जवळीक वाढली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करु लागले व फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले.
दिया आणि वैभवचे लग्न खुपच गुप्तता राखुन झाले होते. लग्नानंतर ते दोघे एकत्र मिडियासमोर आले. त्यावेळी दियाने मिडियावाल्यांना मिठाईसुद्धा दिली होती. त्यावेळी या दोघांच्या लग्नाचे फोटो खुप व्हायरल झाले होते.
१५ आणि १६ फेब्रुवारीला याा दोघांचे लग्न झाले. त्यानंतर हे जोडपे हनिमुनसाठी विदेशात गेले. दिया व वैभव मालदिवला गेले होते. दियाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमधील दियाचा बोल्ड अंदाज दियाच्या चाहात्यांना खुपच आवडला होता. त्या फोटोत दिया बिकनी टॉपमध्ये दिसली होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !