कियारा आडवानी बॉलीवूड मधील खूप सुंदर आणि आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावेल अशी अभिनेत्री आहे. कियारा आडवानी तिच्या सुंदरतेसाठी लोकप्रिय आहे. कियाराला खरी ओळख कबीर सिंग या चित्रपटात काम केल्यानंतर मिळाली या चित्रपटात तिने प्रीतीचे पात्र निभावले होते.
या चित्रपटानंतर कियाराला खूप लोकप्रियता आणि वाहवा मिळाली. प्रीती या पात्राने लोकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. यानंतर कियारा ने एका पेक्षा एक सुपरहीट चित्रपटात काम केले. हल्लीच तीने विकी कौशल आणि भूमि पेडणेकर यांच्यासोबत गोविंदा मेरा नाम या चित्रपटात काम केले आहे.
गोविंदा मेरा नाम या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कियारा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसत आहे. कियाराची फॅन फॉलोईंग देखील आता भरपूर वाढली आहे. कबीर सिंग हा चित्रपट बॉक्सऑफिसवर भरपूर चालला. युथमध्ये तर या चित्रपटाची वेगळीच क्रेज होती. हल्ली कियारा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. ती सतत तिच्या अपडेट सोशल मीडिया अकाऊंट मार्फत देत असते. काही दिवसांपासून कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये कियारा आडवानी आणि विकी कौशल फिल्ममेकर्सची पहिली पसंत आहेत. कियारा आडवानी आता फिल्म इंडस्ट्रीतल्या टॉप अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आली आहे. या जोडीने गोविंदा मेरा नाम या चित्रपटात काम केले आहे. आणि आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
कियारा आडवानी आणि विकी कौशलच्या जोडीला लोकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लोकांना जोडीला स्क्रीनवर पाहायला आवडत आहे. सोशल मीडियावर आपल्याला विकी कौशल आणि कियाराचे प्रमोशनच्या वेळेचे अनेक फोटो पाहायला मिळतील.
नवीन येणाऱ्या चित्रपटामुळे सगळीकडेच कियाराचे भरपूर कौतुक होत आहे. हल्लीच कियाराला आणि विकीला एका ठिकाणी फिल्मचे प्रमोशन करताना स्पॉट केले गेले. यावेळेस कियारा खूपच सुंदर दिसत होती. कियाराने तिच्या हॉटनेसनी आणि बोल्ड अदांनी सगळ्यांच्याच मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. या प्रमोशनच्या वेळेस कीयाराने हिरव्या रंगाचा शॉर्ट टाईट ड्रेस घातला होता. ज्यामध्ये तिची फिगर खूपच उठून दिसत होती. कॅमेरासमोर उभी राहून कियाराने अनेक पोज देत फोटो देखील काढायला दिले. यावेळेच्या कियाराच्या बोल्ड लूकवर सगळेच फिदा झाले होते.
कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली नावाच्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ साली आलेल्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी ही भूमिका देखील तिने निभावली होती.
कलंक, भुलभुलैया, गुड न्यूज, लक्ष्मी, शेरशा अशा अनेक चित्रपटांत कियाराने काम केले आहे. यासोबतच म्युझिक अल्बम आणि वेब सिरीज मध्ये देखील कियाराला पाहिले गेले आहे. आतापर्यंत कियारा तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मन जिंकत आली आहे आणि तिने बॉलीवूडमध्ये स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.