Headlines

सुनील शेट्टीने आपल्या लेकीला आहेरात दिल्या आहेत या महागड्या वस्तू, किंमत पहा डोळे पांढरे होतील !

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथिया शेट्टीने तिचा दीर्घकालीन प्रियकर आणि भारतीय संघाचा क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले आहे. खंडाळा बंगल्यात या जोडप्याने सप्तपदी घेतल्या. दोघेही जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.

त्यानंतर अनेकदा मीडिया समोर लग्नाचे विषय निघाले मात्र त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. आता लग्न झाल्यावर सुनील शेट्टीने आपल्या लाडक्या लेकीला आहेरात काय दिले याची उत्सुकता लोकांना लागली होती. याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

सुनील शेट्टीने आपल्या मुलीला मुंबईत एक आलिशान अपार्टमेंट गिफ्ट केले आहे. त्याची किंमत 50 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. सलमान खानने अथिया शेट्टीला 1.64 कोटी रुपयांची ऑडी कार भेट दिली आहे. जॅकी श्रॉफ सुनील शेट्टीचा खूप चांगला मित्र आहे. त्याने अथिया शेट्टीला ३० लाख रुपयांचे घड्याळ भेट दिले आहे. त्याचबरोबर अर्जुन कपूरने अथिया शेट्टीला दीड कोटी रुपयांचे डायमंड ब्रेसलेट दिले आहे.

केएल राहुलचा मित्र विराट कोहलीने 2.17 कोटी रुपयांची BMW कार गिफ्ट केली आहे. महेंद्रसिंग धोनीने राहुलला कावासाकी निन्जा बाईक भेट दिली आहे, त्या बाईकची किंमत 80 लाख रुपये आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी आता मुंबईत भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहेत. यामध्ये त्याच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील लोकांना बोलावण्यात येईल.

लग्नाचे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार असल्याची माहिती सुनील शेट्टीने आधीच मीडियाला दिली होती. मुलीच्या लग्नानंतर सुनील शेट्टी भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी लग्नासाठी खूप छान व्यवस्था केली होती.

अथिया शेट्टी बद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्री काही चित्रपटांमध्ये दिसली होती मात्र ती प्रेक्षकांच्या मनावर विशेष जादू करू शकली नाही. पण जरी तिने चित्रपटांमध्ये विशेष कामगिरी दाखवली नसली तरीही ती भरपूर कमाई करते. अथियाने सूरज पांचोलीसोबत ‘हिरो’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट पडद्यावर चालला नसला तरी चाहत्यांमध्ये अथियाला नक्कीच ओळख मिळाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !